⁠  ⁠

भगतसिंग, सुखदेव व राजगुरूंना शहिदांचा दर्जा; याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. यासंदर्भात कोणतेही आदेश देऊ शकत नसल्याचे उच्च न्यायालय म्हणाले. तत्पूर्वी उच्च न्यायालयाने याचिकाकर्ता अॅड. बिरेंदर सांगवान यांच्याकडे अशा प्रकारचा कायदा आहे का? अशी विचारणा केली होती. या तीन हुतात्म्यांचा योग्य तो सन्मान करण्यासाठी शहिदांचा दर्जा देणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस अधिकारी जॉन सँडर्सची १९२८ मध्ये हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली होती.

Share This Article