भारताचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींचे निवासस्थान अर्थात राष्ट्रपती भवन सर्वसामान्य जनतेसाठी आता आठवड्यातून चार दिवस खुले राहणार आहे. राष्ट्रपती सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे.आता या निर्णयानुसार गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चार दिवशी सर्वसामान्य जनतेला राष्ट्रपती भवनाला भेट देता येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भवन खुले राहणार आहे. राजपथवरील गेट क्र. २, हुक्मीमाई मार्गावरील गेट क्र. ३७ आणि चर्च रोडवरील गेट क्र. ३८ या ठिकाणांहून राष्ट्रपती भवनाला भेटीसाठी आलेल्यांना प्रवेश तसेच बाहेर पडता येणार आहे. आगामी काळात वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमांतून राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी बुकिंगही करता येणार आहे. भवन पाहण्यासाठी प्रति व्यक्ती ५० रुपये इतके शुल्क आकारले जाते. ८ वर्षांखालील बालकांना येथे प्रवेश विनामुल्य आहे. भारतीय नागरिकांना राष्ट्रपती भवनातील प्रवेशासाठी आपले छायाचित्र असलेले ओळखपत्र तर परदेशी नागरिकांना आपला मुळ पासपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे.
LATEST Post
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती
Published On: नोव्हेंबर 19, 2026
भारतीय कृषी संशोधन परिषदेत विविध पदाच्या 1,393 जागांसाठी भरती
Published On: नोव्हेंबर 19, 2026
NLC इंडिया लि.मध्ये विविध पदांच्या 145 जागांसाठी भरती
Published On: नोव्हेंबर 18, 2026
असम राइफल्स मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती : 10वी, 12वी उत्तीर्णांना संधी
Published On: नोव्हेंबर 18, 2026
MPSC मार्फत विविध पदांच्या 16,717 जागांसाठी मेगाभरती; पदवीधरांना सुवर्णसंधी
Published On: नोव्हेंबर 16, 2026
भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदाच्या 120 जागांसाठी भरती
Published On: नोव्हेंबर 14, 2026
उत्तर रेल्वेत 10वी, ITI उमेदवारांना मोठी संधी; 4651 जागांसाठी भरती
Published On: नोव्हेंबर 9, 2026
सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये 400 जागांसाठी भरती
Published On: नोव्हेंबर 9, 2026















