आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा (सीजीएचएस) लाभ मिळावा, अशी विनंती माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सचिनने २४ ऑक्टोबरला मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अव्वल क्रीडापटूंना उतारवयात भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्येवर प्रकाश टाकताना औषधोपचाराच्या अतिरिक्त खर्चाचा ताण त्यांच्यावर पडतो, असे म्हटले आहे. आपल्या पत्रात त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघांमध्ये समाविष्ट असलेल्या मोहम्मद शाहीद यांचे उदाहरण दिले आहे. एकापेक्षा जास्त अवयव निकामी झाल्याने जुलै महिन्यात शाहीद यांचा मृत्यू झाला होता. बेताची आर्थिक स्थिती असल्याने त्यांना वेळेवर आणि मोठय़ा रुग्णालयात उपचार घेता आले नाहीत. पंतप्रधान मोदी यांना विनंती करण्यापूर्वी क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळण्याबाबत क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्याचे सचिनने त्याच्या पत्रात म्हटले आहे.
LATEST Post
ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर ! IBPS मार्फत 6715 जागांसाठी भरती जाहीर
Published On: जुलै 1, 2026
भारतीय रेल्वेत नोकरीची उत्तम संधी; तब्बल 6557 जागांसाठी भरती सुरु
Published On: जून 30, 2026
RCFL मार्फत विविध पदांसाठी भरती
Published On: जून 29, 2026
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरी संधी; 444 जागांसाठी भरती
Published On: जून 26, 2026
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मार्फत 550 जागांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स उत्तीर्णांना संधी
Published On: जून 26, 2026
MPSC मार्फत लिपिक-टंकलेखकसह विविध पदांच्या 2619 जागांसाठी भरती
Published On: जून 26, 2026
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती; पात्रता पहा..
Published On: जून 19, 2026
AIIMS मार्फत विविध पदाच्या 1400+जागांसाठी भरती
Published On: जून 17, 2026















