⁠  ⁠

Current Affair 16 December 2018

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

श्रीलंका: महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

  • श्रीलंकेतील सत्तासंघर्ष संपवताना महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा शनिवारी राजीनामा दिला आहे. त्यांची नेमणूक करण्याचा वादग्रस्त निर्णय अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी घेतला होता.
  • आता रनिल विक्रमसिंघे यांचा पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथविधी होईल.
  • राजपक्षे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन महत्त्वपूर्ण निकालानंतर राजीनामा दिला असून न्यायालयाने संसद बरखास्त करण्याचा निर्णय व राजपक्षे यांची पंतप्रधानपदी करण्यात आलेली नेमणूक घटनाबाह्य ठरवली होती.
  • राजपक्षे यांची २६ ऑक्टोबर रोजी सिरीसेना यांनी पंतप्रधानपदी नियुक्ती करताना आधीचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून काढले होते. त्यामुळे देशात राजकीय पेच निर्माण झाला होता.

मिझोरामच्या मुख्यमंत्रिपदी झोरमथंगा

  • मिझो राष्ट्रीय आघाडीचे अध्यक्ष झोरमथंगा यांचा शनिवारी मिझोरामचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यांच्यासह एकूण बारा मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल के. राजशेखरन यांनी राजभवनात त्यांना अधिकारपद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • ईशान्येकडील मिझोराम राज्याचे ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. यापूर्वी ते एमएनएफच्या राजवटीत १९९८ व २००३ मध्ये मुख्यमंत्री होते.
  • झोरमथंगा यांच्यासह इतर अकरा मंत्र्यांना शपथ देण्यात आली, त्यात पाच कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री आहेत.

ओबामाकेअर योजना घटनाबाह्य

  • ओबामाकेअर योजना घटनाबाह्य़ असल्याचा निकाल संघराज्य न्यायाधीशांनी दिला असून त्यामुळे ट्रम्प प्रशासनाचा मोठा विजय झाल्याचे मानले जात आहे.
  • टेक्सासच्या संघराज्य न्यायाधीशांनी संपूर्ण अ‍ॅफॉर्डेबल केअर अ‍ॅक्ट रद्दबातल ठरवला असून हा कायदा म्हणजेच ओबामाकेअर योजना होय. व्यक्तिगत पातळीवर आरोग्य सुरक्षेसाठी ओबामा प्रशासनाने ही योजना आणली होती.
  • तर रिपब्लिकन पक्षाचे काही गव्हर्नर व राज्यांचे महाधिवक्ते यांच्या गटाने ओबामाके अरविरोधात याचिका दाखल केली होती.
  • तसेच सर्वोच्च न्यायालयाने ओबामाकेअरचा अ‍ॅफॉर्डेबल केअर अ‍ॅक्ट हा 2012 व 2015 मध्ये घटनात्मक पातळीवर योग्य ठरवला होता.

पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाला ४७ वर्षे पूर्ण

  • संपूर्ण देश आज ‘विजय दिवस’ साजरा करतोय. १९७१ साली पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाला ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानसोबत १३ दिवस चाललेल्या युद्धात १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने विजय मिळवला होता
  • भारतीय जवानांचं शौर्य आणि साहसाला सलाम करण्यासाठी आणि त्या विजयाची आठवण कायम राहावी यासाठी दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
  • बांगलादेशचा उदय
  • या युद्धात जवळपास ३ हजार ८४३ भारतीय जवान शहीद झाले होते. या युद्धात चारी मुंड्या चीत झालेल्या पाकिस्तानी सैन्यानं अखेर भारतीय लष्करांपुढे नांगी टाकत आत्मसमर्पण केलं आणि यानंतर बांगलादेश या नव्या देशाचा उदय झाला.
Share This Article