• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Thursday, June 30, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

Current Affair 29 December 2018

Chetan Patil by Chetan Patil
December 29, 2018
in Daily Current Affairs
0
1 21
WhatsappFacebookTelegram

भूतानच्या पंचवार्षिक योजनेसाठी भारताची मदत

  • भारताने भूतानला ४५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून, त्या देशाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ही मदत करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे भूतानी समपदस्थ लोटे त्सेरिंग यांनी द्विपक्षीय चर्चा केली.
  • त्सेरिंग यांचे पहिल्या परदेश भेटीवर आगमन झाले. त्यांनी गेल्या महिन्यात भूतानचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत.
  • भारताने त्यांच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ४५०० कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. भूतानने या वर्षी नवी पंचवार्षिक योजना सुरू केली असून, तिची मुदत २०२२ पर्यंत आहे.

गगनयान अवकाशात झेपावणार

  • इस्त्रोच्या मिशन गगनयानला केंद्र सरकारचा हिरवा कंदिल मिळाला असून लवकरच भारतीय अंतराळवीर या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.
  • या मोहिमेंतर्गत ३ भारतीय अंतराळवीर अवकाशात सात दिवस मुक्काम करणार आहेत. ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.
  • येत्या दिड ते दोन महिन्यात हे मिशन सुरू होणार आहे. जगातील इतर देशही सॅटेलाइट लॉन्च करण्यासाटी इस्रोची मदत घेत आहेत. या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भारताने रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे.
  • या शिवाय २०२२ पर्यंत गगनयान अंतराळात पाठवणार असल्याचं इस्रोचे प्रमुख सिवन यांनी आधीच सांगितलं आहे. त्याआधी २०२० आणि २०२१ मध्ये दोन मानवरहित यानही अवकाशात पाठवण्यात येणार आहे.
  • या मोहिमेची जबाबदारी एका महिलेच्या हाती सुपूर्द करण्यात येणार असून इस्रोच्या या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. व्ही. आर. ललिथंबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनीयर करणार आहेत. त्या गेल्या ३० वर्षांपासून इस्रोमध्ये काम करीत आहेत.
  • गगनयान मोहिमेअंतर्गत पाठविण्यात येणार अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल, अपेक्षित आहे, या प्रकल्पामध्ये विविध संघटना, तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मंडळी सहभागी असतील.

जागतिक शिखर परिषदेमध्ये पाकिस्तानचा समावेश

  • यंदाच्या वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेमध्ये पाकिस्तानील व्यावसायिकांची शिष्टमंडळे सहभागी होणार आहेत. 2013 नंतर प्रथमच पाकिस्तानातील व्यावसायिकांचे शिष्टमंडळ या परिषदेमध्ये दिसणार आहे.
  • दिनांक 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान गुजरातमध्ये ही परिषद होणार आहे. जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना गुजरातकडे आकर्षित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनीच गुजरातचे मुख्यमंत्री असताना वायब्रंट गुजरातची संकल्पना मांडली होती.
  • पाकिस्तानच्या वेगवेगळया भागातून व्यावसायिकांची सात शिष्टमंडळे या परिषदेमध्ये सहभागी होऊ शकतात असे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे. इतक्या मोठया संख्येने पाकिस्तानी उद्योगपती वायब्रंट गुजरात परिषदेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
  • विविध देशांच्या वाणिज्य आणि व्यापारी मंडळांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या 52 शिष्टमंडळांनी आंतरराष्ट्रीय चेंबरच्या जागतिक परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याचे कळवले आहे. वायब्रंट गुजरात परिषदेतील हा एक कार्यक्रम आहे.

शिवचरित्राचा आता हिंदूी अनुवाद होणार

  • ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘शिवाजी : हिज लाइफ अँड टाइम्स‘ या शिवचरित्रावरील मूळ इंग्रजी ग्रंथाचा हिंदूी अनुवाद केला जाणार आहे. अनुवादाचा हा प्रकल्प हाती घेण्याचा संकल्प भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने केला आहे.
  • भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी भांडारकर संस्थेला अशा स्वरूपाचा प्रस्तावा दिला असून या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आपल्या खासदार निधीतून अर्थसाह्य़ करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
  • शताब्दी पार केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये नुकत्याच भरविण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला खासदार राकेश सिन्हा यांनी आवर्जून भेट दिली. संस्थेच्या वाटचालीची माहिती घेऊन सिन्हा यांनी प्राच्यविद्या क्षेत्रातील संस्थेच्या मूलभूत संशोधनपर कार्याचा गौरव केला.
  • ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘शिवाजी : हिज लाइफ अँड टाइम्स’ या मूळ इंग्रजी ग्रंथाचा हिंदूी अनुवाद करण्याचा प्रकल्प भांडारकर संस्थेने हाती घ्यावा, असा प्रस्ताव संस्थेचे विश्वस्त आणि शिपिंग बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्याकडे दिला.

Tags: chalu ghadamodiMPSC Current AffairsMPSC Daily Current Affairs
SendShare155Share
Chetan Patil

Chetan Patil

Related Posts

Current Affairs 29 june 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 29 जून 2022

June 29, 2022
Current Affairs 28 june 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 28 जून 2022

June 28, 2022
Current Affairs 27 june 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 27 जून 2022

June 27, 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NABCONS

NABCONS : नाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेज महाराष्ट्रमध्ये भरती

June 29, 2022
sbi bharti 2022

SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 211 जागा

June 29, 2022
MPSC State Service Prelims Admit Card 2021

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1695 पदे रिक्त

June 29, 2022
Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 । Police Bharti 2022 Maharashtra

June 29, 2022
Current Affairs 29 june 2022

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 29 जून 2022

June 29, 2022
police bharti

Police Bharti : राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ; गृहविभागाची अधिसूचना जारी

June 28, 2022
  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group