⁠  ⁠

चालू घडामोडी : ०७ ऑगस्ट २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 6 Min Read
6 Min Read

Current Affairs 07 August 2020

अमेरिका : भारतीय वंशाचे डॉ. चोकसी न्यूयॉर्कचे नवे आरोग्य आयुक्त

  • भारतीय वंशाचे डॉ. डी. ए. चोकसी यांची न्यूयाॅर्क शहराचे नवे आरोग्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर बिल डे ब्लासियो यांनी कोरोना विषाणूवर मात करण्याच्या त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे कौतुक केले. ब्लासियो म्हणाले, चोकसी यांनी आपल्या करिअरमध्ये ज्यांना नेहमी मागे टाकले जाते, अशा लोकांशी लढा दिला. डॉ. ऑक्सिरिस बारबोट यांच्या राजीनाम्यानंतर चोकसी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. चोकसी यांच्या सुरुवातीच्या दोन पिढ्या गुजरातहून मुंबईत स्थायिक झाल्या होत्या. नंतर वडील अमेरिकेत गेले. तेथेच चोकसींचा जन्म व लहानाचे मोठे झाले. ओबामा प्रशासनात तेथे व्हाइट हाऊस फेलो व मंत्र्यांचे मुख्य आरोग्य सल्लागार होते.

नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम सोबत करार

आनंदाची बातमी : लसीचा पुरवठा ...
  • करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीचा पुरवठा आणि परवाना देण्यासंदर्भात नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियासोबत करार केला आहे.
  • नोव्हाव्हॅक्सने बुधवारी ही माहिती दिली. नोव्हाव्हॅक्स अमेरिकन लस उत्पादक कंपनी आहे.
  • या करारामुळे नोव्हव्हॅक्सच्या भारतातील लस उत्पादनाचे सर्वाधिकार सिरमकडे असणार आहेत. नोव्हाव्हॅक्सच्या एसईसी फाईलनुसार, 30 जुलै रोजी हा करार झाला.
  • नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या लसीचे प्राथमिक स्तरावर अपेक्षित निकाल मिळाले आहेत. सप्टेंबरपासून नोव्हाव्हॅक्स तिसऱ्या फेजची चाचणी सुरु करेल. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.ऑपरेशन वार्प स्पीड अंतर्गत अमेरिकेने करोनावरील लस
  • निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीला 1.6 अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली होती.
  • भारतात लवकरच सिरमकडून ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु होतील.

ट्रम्प यांचा चीनला धक्का; टिकटॉकवरील बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी

maharashtra times
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर टिकटॉक आणि वीचॅट या दोन अॅपवर बंदी आणण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
  • या आदेशानुसार आता या दोन्ही कंपन्यांना कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. ट्रम्प यांनी याआधी अमेरिकन कंपनीला टिकटॉक विकावे अथवा अमेरिकेतून गाशा गुंडाळा, असा इशारा बाइटडान्स या कंपनीला दिला होता. त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्या आदेशावर ट्रम्प यांनी आता स्वाक्षरी केली आहे.
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी सायंकाळी चिनी अॅप असलेल्या टिकटॉक आणि वीचॅटवर ४५ दिवसांमध्ये बंदी आणण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
  • या आदेशानंतर आता टिकटॉक १५ सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनीला विकावे लागणार आहे.
  • मे महिन्यातच डिझनीशी संबंधित असलेले केविन मेयर यांना आपले सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. त्याशिवाय बाइटडान्सने आपले मुख्य कार्यालय बीजिंगहून वॉशिंग्टनला हलवण्याची तयारी दर्शवली

जम्मू-काश्मीरच्या भ्रष्टाचारावरलिहिल्यास पुस्तक बेस्ट सेलर

  • जम्मू-काश्मीरमधील भ्रष्टाचार व येथील पद्धतींवर लिहिण्याचे ठरवल्यास एखादे पुस्तक तयार होईल. तेही बेस्ट सेलर. राज्यात कोणत्याही नियमांचे पालन होत नव्हते. कोणती प्रक्रिया पाळली जात नव्हती. परंतु एवढी घाण कोठेही पाहिली नाही, असे राज्याचे मुख्य सचिव बी.व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
  • येथील सरकारांनी आपल्या लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी भ्रष्ट पद्धतीने कामे केली. सरकारी पैसे मोजक्या कुटुंबांपुरते मर्यादित ठेवण्यात आले. नेते, नोकरशहा, बिझनेस क्लास, बँकर्स यांनी मिळून राज्याचे हाल केले. अशा प्रकारे नियम-कायदे भ्रष्टाचाराच्या दृष्टीने तयार करण्यात आले.
  • सरकार बदलल्यास कामे खोळंबतात. कारण नवे सरकार आपल्या लोकांची कामे करण्यास प्राधान्य देते.
  • ५ ते १० वर्षांपासून सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प अडकून पडले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भविष्यातील रिक्त पदांची आधीच भरतीदेखील करण्याचे प्रयोग झाले.
  • गुणवत्ताही बघण्यात आली नाही. पारदर्शकतेचा प्रश्नच नाही. त्यामुळे पात्र मुले सरकारी नोकरीपासून वंचित राहतात. शारीरिक शिक्षण क्षेत्रात २७०० शिक्षकांना विनापरीक्षा भविष्यातील रिक्त पदांच्या आधारे करारावर घेण्यात आले आहे. सुरक्षा दलांवर दगड मारणाऱ्या मुलांचा काही दोष नाही. त्यांनी ना पाकिस्तान पाहिला ना भारत. त्यांच्यासाठी काहीही करण्यात आलेले नाही.
  • जम्मू-काश्मीर बँकेला तर सुनियोजितपणे लुटण्यात आले. एखाद्या उद्योजकाने प्रकल्पाचा प्रस्ताव आणल्यास त्याला मागणीपेक्षा जास्त कर्ज देण्यात आल्याची प्रकरणे आहेत. दोन ते तीन वर्षांत कंपनी तोट्यात जाते. नंतर कर्जाची रक्कम एनपीए म्हणून जाहीर केली जाते. बँकेला नुकसान झाल्यास कॅपिटल अमाउंट सरकारकडून बँकेला देण्यात आली. माझी मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यावर देशाच्या सर्वोच्च नेत्याने येथील घाण साफ करण्यास सांगितले होते. आता लवकरच ३५ हजार सरकारी नोकऱ्यांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. आगामी काही वर्षांत ४ ते ५ लाख नोकऱ्या खासगी क्षेत्रात तयार केल्या जातील, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

देशातील पहिली ‘किसान रेल’ आज देवळालीहून रवाना होणार

The first 'Kisan Rail' will leave Deolali today | पहिली ‘किसान रेल’ आज देवळालीहून रवाना होणार
  • भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने वाहतुकीसाठी रेल्वेची ‘किसान रेल’ ही विशेष सेवा शुक्रवारपासून सुरू होत असून अशी पहिली गाडी नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथून बिहारमधील दानापूरकडे रवाना होईल.
  • नाशिवंत मालाच्या पूर्णपणे वातानुकुलित वाहतुकीसाठी खासगी उद्योगांच्या भागिदारीने अशी विशेष रेल्वे सुरु करण्याची घोषणा वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाचा अर्थसंंकल्प मांडताना केली होती.
  • या रेल्वेने शेतकऱ्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत विनाखंड वातानुकुलित वातावरणात मालाची वाहतूक करण्याची सोय उपलब्ध होईल. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर व रेल्वेमंत्री पियुष गोयल दिल्लीतील ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.
  • भारतीय रेल्वेने ही माहिती देताना एका निवेदनात म्हटले की, पहिली ‘किसान रेल’ गाडी ७ आॅगस्ट रोजी देवळाली येथून सकाळी ११ वाजता रवाना होईल व १,५१९ किमीचे अंतर ३१ तास ४५ मिनिटांत कापून शनिवारी (८ आॅगस्ट) सायंकाळी ६.४५ वाजता पोहोचेल.

Share This Article