⁠  ⁠

Current Affairs 13 March 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

महासागरात सात हजार सूक्ष्म जीवांच्या प्रजातींचा शोध

  • प्रशांत, अ‍ॅटलांटिक व हिंदी महासागरात सूक्ष्म जीवांच्या एकूण सात हजार नवीन प्रजाती सापडल्या असून त्यामुळे जैवविविधतेचे आपले
    ज्ञान अधिक विस्तारणार आहे.
  • हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिकांनी या सूक्ष्म जीवांचा शोध घेतला असून त्यात
    अ‍ॅसिडोबॅक्टेरिया या नैसर्गिक सूक्ष्म जीवाचा समावेश आहे.
  • हा सूक्ष्म जीव सागरी असून त्यात पहिल्यांदा क्रिस्पर ही जनुक संपादन प्रणाली नैसर्गिक पातळीवर दिसून आली होती.अ‍ॅसिडोबॅक्टेरिया
    हा नवीन प्रकारच सागरी सूक्ष्म जीव असून तो फायला या प्रवर्गात मोडणार आहे. जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध
    झाले असून जगात केवळ ३५००० सूक्ष्म सागरी जीव ८० सागरी जीवाणू असल्याचा दावा खोटा ठरला आहे.
  • तो मातीतही असतो त्याचा उपयोग प्रतिजैविके व कर्करोगविरोधी औषधे तयार करण्यासाठी वापरतात कारण त्यात विशिष्ट प्रकारची
    जनुके असतात. या प्रजातींमुळे रोगांवर नवीन उपचार पद्धती विकसित करणे शक्य होणार असून सागरी प्रजातीत नैसर्गिक जनुक संपादन
    प्रक्रिया म्हणजे क्रिस्परचा अवलंब होत असतो.

थेरेसा मे यांना पुन्हा धक्का, ब्रेग्झिट करारावरील मतदानात दुसऱ्यांदा पराभव

  • युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबतच्या ब्रेग्झिट समझोत्यावर ब्रिटनच्या प्रतिनिधीगृहात मतदान झाले. हा करार प्रतिनिधी
    गृहाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. ब्रेग्झिट करारावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पंतप्रधान थेरेसा दुसऱ्यांदा हादरा बसला असून 391 विरुद्ध 242
    मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
  • ब्रिटनच्या जनतेने 2016 मध्ये ब्रेग्झिटच्या बाजूने निसटता कौल दिल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या थेरेसा यांनी दोन वर्षे
    युरोपीय महासंघाशी वाटाघी केल्या.
  • त्यासंदर्भातील ब्रेग्झिट करारावर मंगळवारी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मतदान झाले. 391 विरुद्ध 242 मतांनी हा
    प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. यंदा थेरेसा मे यांना 149 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

बोइंग ७३७ मॅक्सवर भारतातही बंदी

  • इथियोपियात बोइंग ७३७ मॅक्स विमान कोसळल्यानंतर तीनच दिवसांत भारतानेही या विमानावर बंदी घातली आहे.
  • इथियोपियन एअरलाइन्सचे बोइंग ७३७ मॅक्स हे विमान राजधानी ‘आदिस अबाबा’ जवळ कोसळलं. या दुर्घटनेत १५७ जणांचा
    जागीच मृत्यू झाला.
  • या विमानात काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे नेदरलँड,इंग्लंड आणि तुर्कीने या विमानांच्या वापरावर आधीच बंदी घातली आहे
  • भारताशिवाय आशियातील सिंगापूर ,मलेशिया आणि ओमान या देशांनीही या विमानावर पूर्णपणे बंदी घातली आहे. चीन आणि
  • इंडोनेशियाने घरगुती एयरलाइन्सला या विमानाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.
  • सर्वाधिक ७३७ मॅक्स विमान स्पाइसजेट एअरलाइन्सकडे आहेत. पण नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असल्याचं जाहीर करत त्यांनीही
    या विमानांचा वापर बंद केला आहे.

गुजरातमध्ये सापडली ५००० वर्षं जुनी दफनभूमी

  • सुमारे ५२०० वर्षे जुनी दफनभूमी गुजरातच्या कच्छ परिसरात सापडली आहे. हडप्पा संस्कृतीतील ढोलावीरा या शहरापासून ही दफनभूमी
    ३६० किमी अंतरावर असून याठिकाणी एक सहा फूट लांबीचा ५००० वर्षांपूर्वीचा मानवी मृतदेहाचा सांगाडाही सापडला आहे.
  • गुजरातमध्ये सापडलेल्या इतर सर्व दफनभूमी अर्धचंद्राकृती किंवा वर्तुळाकार होत्या. ही दफनभूमी मात्र आयताकृती आहे.
  • या उत्खननात मानवी मृतदेहाच्या सांगाड्यांशिवाय प्राण्यांचेही सापळे सापडले आहेत. तसेच खडे, बांगड्या आणि काही अवजारंही सापडली
    आहेत. केरळ विद्यापीठ आणि कच्छ विद्यापीठाने संयुक्तपणे हे उत्खनन केलं आहे. या उत्खननात सापडणाऱ्या सर्व गोष्टींचा सविस्तर
    अभ्यास केला जाणार असून या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक आयुष्याचा शोध घेतला जाणार आहे. तसंच
    इथे राहणाऱ्या लोकांचा हडप्पाच्या संस्कृतीशी काही संबंध होता का हेही शोधलं जाणार आहे.

भारतातील मतसंग्राम ठरणार जगातील सर्वात महागडी निवडणूक :

  • जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात पुढील दोन महिने सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या (सीएमएस) अहवालानुसार भारतातील ही निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे.
  • भारतातील निवडणुकीवर यंदा तब्बल 50, 000 कोटी रुपये (सात अब्ज डॉलर) इतका खर्च होण्याची शक्यता असून अमेरिकेतील निवडणुकीवर 2016 साली 6.5 अब्ज डॉलर खर्च झाले होते. तर भारतात 2014 साली निवडणुकीवर 5 अब्ज डॉलर खर्च झाले होते.
  • तसेच सेंटर फॉर मीडिया स्टडीजने निवडणुकीतील खर्चासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारावर 8 डॉलर खर्च होणार आहे. भारतातील 60 टक्के जनतेचे दिवसाचे उत्पन्न तीन डॉलर असून त्यातुलनेत निवडणुकीत प्रत्येक मतदारावर होणारा खर्च जास्त आहे.

Share This Article