⁠  ⁠

चालू घडामोडी : १७ फेब्रुवारी २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Current Affairs : 17 February 2021

नायब राज्यपालपदावरून बेदी दूर

kiran bedi 1

पुडुचेरीतील नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरून दूर करण्यात आले असून तेलंगणाच्या राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्याकडे पुडुचेरीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
पुडुचेरीच्या नायब राज्यपालपदी नव्या व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत सुंदरराजन यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे माध्यम सचिव अजयकुमार सिंह यांनी एका निवेदनामध्ये म्हटले आहे.

प्रीती सिन्हा यूएन भांडवल विकास काेषच्या सचिवपदी

Image result for प्रीती सिन्हा

जिनिव्हा | संयुक्त राष्ट्र भांडवल विकास कोषने (यूएनसीडीएफ) भारतीय वंशाच्या इन्व्हेस्टमेंट व डेव्हलपमेंट बँकर प्रीती सिन्हांची कार्यकारी सचिवपदी नियुक्ती केली. त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. १९६६ मध्ये स्थापन यूएनसीडीएफ संस्थेचे मुख्यालय न्यूयाॅर्कमध्ये आहे. त्याचे काम कमी विकसित देशांना लघुकर्जे उपलब्ध करणे आहे.

Share This Article