चालू घडामोडी : २ नोव्हेंबर २०१९

Current Affairs 2 November 2019

‘जीएसटी’ संकलन घसरतेच

सणोत्सवाचा महिना असतानाही, ऑक्टोबरमधील जीएसटी संकलन घसरले आहे

– वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीतून सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात ९५,३८० कोटींचा महसूल गोळा होऊ शकल्याचे, केंद्र सरकारने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून स्पष्ट झाले. गेल्या वर्षी याच महिन्यातील जीएसटी संकलन १,००,७१० कोटी रुपये इतके होते.

– सणोत्सवाचा महिना असतानाही, ऑक्टोबरमधील जीएसटी संकलन घसरले आहे. दसरा-दिवाळीतही बाजारपेठा नरमलेल्या आणि खरेदीला अपेक्षित जोर चढू शकलेला नाही, याचेच हे प्रत्यंतर आहे. तर सलग तिसऱ्या महिन्यांत सरकारला अपेक्षित असलेले मासिक एक लाख कोटी रुपयांच्या कर-संकलनाचे लक्ष्यही हुकले आहे. सप्टेंबर २०१९ मधील कर संकलन ९१,९१६ कोटी रुपये असे होते.

राजधानीत आरोग्य आणीबाणी

in

– दिल्ली शहर आणि राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घेणेदेखील मुश्कील झाले आहे. शुक्रवारी वायुप्रदूषणाची स्थिती इतकी खालावली की पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली.

– दिल्ली गॅस चेंबर बनली असून नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होऊ  लागला आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतजमिनी जाळल्या जात असून त्याचा भुर्दंड दिल्लीकरांना भोगावा लागत असल्याची टीका आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीजवाल यांनी केली आहे. दिल्ली सरकारने शाळांना पुढील पाच दिवस सुट्टी दिली असून ५० लाख मास्कचे वाटप केले जाणार असून शुक्रवारी केजरीवाल यांनी वाटपाला सुरुवात केली.

भारताच्या निर्यात प्रोत्साहन योजनांविरोधात जागतिक व्यापार संघटनेचा निकाल

आंतरराष्ट्रीय निकषांत बसत नसल्याचा ठपका

14 wto

– अमेरिकेने देशी निर्यात प्रोत्साहन योजनांच्या मुद्दय़ांवर केलेल्या तक्रारीत जागतिक व्यापार संघटनेने भारताच्या विरोधात निकाल दिला असून अशा निर्यात प्रोत्साहन योजना या आंतरराष्ट्रीय व्यापार निकषांत बसणाऱ्या नसल्याचे म्हटले आहे. या निकालाचे अमेरिकेने स्वागत केले असून यामुळे अमेरिके तील कामगारांना समान संधीचा लाभ झाला असल्याचे म्हटले आहे. भारताने मात्र या निकालावर अपील करण्याचे ठरवले आहे असे नवी दिल्ली येथे एका अधिकाऱ्याने सांगितले.

– भारताने त्यांच्या उत्पादकांना निर्यातीसाठी लागू केलेल्या प्रोत्साहन योजना या पक्षपाती आहेत, त्यामुळे इतर देशांवर अन्याय होतो असे जागतिक व्यापार संघटनेने स्पष्ट केले.

– या निकालामुळे आता भारताला  प्रोत्साहन योजनांमध्ये बदल करून त्या जागतिक व्यापार संघटनेच्या नियमात बसू शकतील अशा पद्धतीने तयार कराव्या लागतील.  या निकालामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार असून तातडीने यावर पर्याय शोधावा लागणार आहे.

– जागतिक व्यापार संघटनेच्या तंटा निवारण समितीने म्हटले आहे की, भारताने निर्यात वाढीवर आधारित अनुदाने देऊ नयेत, शिवाय या प्रोत्साहन योजना रद्द करण्यासाठी भारताला इतर विकसनशील देशांप्रमाणे आठ वर्षांचा कालावधीही दिला जाणार नाही.

झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यात निवडणुका; 23 डिसेंबर रोजी निकाल

– झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. येथील ८१ विधानसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे. राजकीय पक्षांना बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे.

– निवडणुकीचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर, तिसरा टप्पा – १२ डिसेंबर, चौथा टप्पा – १६ डिसेंबर आणि शेवटचा पाचवा टप्पा २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. २०१४ मध्ये झारखंडमध्ये चार टप्प्यात निवडणूक पार पडली होती, तेव्हा भाजपाला सर्वाधिक ३७ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० संपुष्टात येणार आहे. झारखंडमधील एकूण मतदारांची संख्या २.२६ कोटी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषदेद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

14 वा ‘राष्ट्रीय आरोग्य स्थिती 2019’ अहवाल

– भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 14 वा ‘राष्ट्रीय आरोग्य स्थिती 2019’ अहवाल जाहीर केला आहे.  

– सन 2012-16 मध्ये भारतामधली आयुर्मर्यादा सरासरी 68.7 वर्षे होती, जी 1970-75 साली 49.7 वर्षापेक्षा कमी होती. सन 2012-16 मध्ये भारतामधली आयुर्मर्यादा महिलांसाठी 70.2 वर्षे व पुरुषांसाठी 67.4 वर्षांवर गेले आहे.

भारत-जर्मनीदरम्यान संरक्षण, नदी स्वच्छता, शिक्षणासह १७ करार

– अंतराळ, नागरी उड्डाण, स्मार्ट सिटी नेटवर्क, कौशल्य विकास, स्टार्ट अप्स, शेती, तंत्रज्ञान, आरोग्य, रुग्णांचे पुनर्वसन, नदी स्वच्छता, सागरी तंत्रज्ञान, वैज्ञानिक सहकार्य, आयुर्वेद, योग तसेच ध्यान, उच्च शिक्षण, निरंतर विकास, संस्कृती, फुटबॉल, व्हिसा, ट्रान्सपोर्ट.
17 करार झाले
–मोदी-मर्केल यांनी पाचव्या आयसीजे बैठकीत आपल्या देशाचा दहशतीसाठी वापर करू न देण्याचा संकल्प केला
-जर्मनीच्या चान्सलर अंगेला मर्केल ३ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी गुरुवारी रात्री उशिरा भारतात पोहोचल्या. शुक्रवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हैदराबाद हाऊसमध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी पाचव्या इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन (आयजीसी) बैठकीत भाग घेतला. त्यानंतर आपल्या देशाचा दहशतीसाठी वापर करू न देण्याचा संकल्प करत पाकिस्तानला संदेश दिला. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाच्या धोक्यांशी सामना करण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढवण्याचा संकल्प केला. भारत आणि जर्मनी यांच्यात १७ करार करण्यात आले. तसेच दोन्ही देशांनी ५ संयुक्त घोषणापत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. करारानुसार १०८ उपनिषदांचे जर्मन भाषेत अनुवाद करण्यात येईल. तसेच जर्मन साहित्याचा अनुवाद हिंदी आणि संस्कृतमध्ये करण्यात येईल. मोदींनी जर्मन चान्सलर यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि त्यांना भारताचा चांगला मित्र म्हटले. ते म्हणाले की, अंगेला मर्केल केवळ युरोपच नव्हे तर संपूर्ण जगात दीर्घ काळापासून देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्या आहेत. मर्केल पूर्ण जगातील कणखर नेत्या आहेत.

टुंब कल्याण मंत्रालयाने 14 वा ‘राष्ट्रीय आरोग्य स्थिती 2019’ अहवाल जाहीर केला आहे.  

– सन 2012-16 मध्ये भारतामधली आयुर्मर्यादा सरासरी 68.7 वर्षे होती, जी 1970-75 साली 49.7 वर्षापेक्षा कमी होती. सन 2012-16 मध्ये भारतामधली आयुर्मर्यादा महिलांसाठी 70.2 वर्षे व पुरुषांसाठी 67.4 वर्षांवर गेले आहे.चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Leave a Comment