Wednesday, May 25, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
  • Home
  • Article
  • Video
  • Download
  • Lokrajya
  • MPSC Advertisement
  • Book List
  • Syllabus
  • Become a Guest Writer
  • Contact Us
  • Copyright
ADVERTISEMENT

Current Affairs – 22 October 2018

Chetan Patil by Chetan Patil
May 14, 2022
in Daily Current Affairs
0
CURR
WhatsappFacebookTelegram

Table of Contents

  • युवाभरारी – युवा ऑलिम्पिक
  • चीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल
  • राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन :
  • स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर ध्वजारोहण 
  • आरडीसीसी बँकेला सहकारमहर्षी पुरस्कार 

युवाभरारी – युवा ऑलिम्पिक

  • अर्जेटिनातील ब्यूनस आयर्समध्ये पार पडलेल्या तिसऱ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर नवा इतिहास रचला आहे. युवा ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी प्रथमच सुवर्णपदकाची कमाई करीत पदकतालिकेत गरुडभरारी घेण्यात योगदान दिले. भारतीय युवकांनी केलेल्या या अफलातून कामगिरीमुळे नजीकच्या दोन ऑलिम्पिक्समध्येदेखील भारत मागील काळापेक्षा मोठी झेप घेऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे.
  • भारतीय वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालनिरुंगाने भारताला युवा ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले, तर थबाबीदेवीने ज्युडो या खेळात भारताला प्रथमच आणि तेदेखील थेट सुवर्णपदक मिळवून देण्याचा सन्मान पटकावला. याचप्रमाणे ध्वजवाहकाचा मान देण्यात आलेल्या मनू भाकरनेदेखील विश्वास सार्थ ठरवत भारताला नेमबाजीत अजून एका सुवर्णपदकाची कमाई करून दिली.
  • त्याशिवाय नऊ रौप्यपदके आणि एक कांस्यपदक अशा जबरदस्त कामगिरीमुळे युवा ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रथमच पदकसंख्या दुहेरी करण्यात यश मिळाले. तब्बल १३ पदकांची कमाई करीत भारताने यंदाच्या युवा ऑलिम्पिकमध्ये थेट १७व्या स्थानावर उडी घेतली आहे.

september mpsc ebook

deepsthabha advt deepsthabha advt deepsthabha advt
ADVERTISEMENT

चीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल

  • अनेक नवनवीन प्रयोग जगासमोर सादर करणाऱ्या चीननं आणखी एक विक्रम केला आहे. चीननं समुद्रावर जगातील सर्वात लांब पूल उभारला आहे. जवळपास ५५ किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. चीनमधील ११ शहरांमधून हा पूल जातो.

राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन :

  • राष्ट्रीय पोलीस दिवसानिमित्त राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते झाले.
  • दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील (एनडीआरएफ) जवानांसाठी आता प्रत्येक वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
  • तर 21 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत लडाख येथील हॉट स्प्रिंगमध्ये शहीद झालेल्या आपल्या निमलष्करी दलाच्या 10 जवानांच्या आठवणीसाठी पोलीस स्मारक दिवस पाळला जातो.

telegram ad 728

स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच
लाल किल्ल्यावर ध्वजारोहण 

  • स्वातंत्र लढ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेला आज 75 वर्षे पूर्ण झाली आहे.
  • यानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच ध्वजारोहन केले.
    यावेळी बोलताना मोदी म्हणाले, नेताजींचा एकच हेतू होता एकच मिशन होते ते म्हणजे देशाचे स्वांतत्र्य. हीच त्यांची विचारधारा होती आणि हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते.
  • भारताने आजवर अनेक क्षेत्रात प्रगती केली असली तरी अद्याप नव्या उंचीवर पोहोचणे बाकी आहे. हेच लक्ष गाठण्यासाठी भारताचे आज 130 कोटी लोक नव्या भारताचा संकल्प घेऊन पुढे जात आहेत.

आरडीसीसी बँकेला सहकारमहर्षी पुरस्कार 

  • महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘सहकारमहर्षी’ हा सर्वोच्च पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (आरडीसीसी)ला जाहीर झाला आहे.
  • विशेष म्हणजे, 2012-13 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे पुरस्कार सुरू करण्यात आले असून, 2012-13 मध्ये आरडीसीसी बँकेला ‘सहकारनिष्ठ’, 2013-14 मध्ये ‘सहकारभूषण’ हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
  • ‘सहकारमहर्षी’ हा सहकार क्षेत्रातील राज्यातील सर्वोच्च पुरस्कार असून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांमधून या पुरस्काराकरिता निवड केली जाते.
  • तसेच यामध्ये राज्यातील गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, सूतगिरण्या, डेअरी, मल्टीस्टेट सहकारी बँका, हातमाग, यंत्रमाग, पणन अशा विविध एकूण 2 लाख 38 हजार सहकारी संस्था असून, त्यात शिखर संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, बिगर कृषी पतसंस्था, पणन संस्था, शेतीमाल प्रक्रि या उपक्रम संस्था, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका, नागरी पतसंस्था, नोकरदारांच्या संस्था, सहकारी दुग्ध संस्था या सर्वांमधून ‘सहकारमहर्षी’ हा पुरस्कार निवडला जात असून, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या सर्वच सहकारी संस्थांमधून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

‘आयएनएफ’ करारातून अमेरिका बाहेर 

  • शीतयुद्धाच्या काळापासून रशियाबरोबर करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र नियंत्रण करारातून अमेरिकेने माघार घेण्याचेCठरवले आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले.
  • तर या करारानुसार दोन्ही देशांकडे किती क्षेपणास्त्रे असावीत यावर काही मर्यादा होत्या, पण रशियाने या कराराचे पालन केले नाही असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
  • ‘दी इंटरमिजिएट रेंज न्यूक्लियर फोर्सेस ट्रीटी’ म्हणजे आयएनएफ करार हा शस्त्रास्त्र नियंत्रण करारापैकी एक असून तो दोन वर्षांत संपुष्टात येत आहे.
  • तसेच 1987 मध्ये करण्यात आलेल्या या करारात अमेरिका व त्याच्या युरोप तसेच अतिपूर्वेकडील मित्रदेशांच्या संरक्षणाचा हेतू होता.तर या करारानुसार अमेरिका व रशिया यांना 300 ते 3400 मैल पल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करणे, त्याची चाचणी करणे, ती बाळगणे यावर प्रतिबंध होता.

add header new नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Tags: chalu ghadamodiCurrent AffairsMPSC Daily Current Affairs
SendShare134Share
Next Post
mahatma jyotiba phule1

महात्मा जोतिबा फुले

balshastri-jambhekar

आचार्य बाळशास्त्री जांभेकर

307814 lion

Current Affairs 29 October 2018

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group