⁠  ⁠

चालू घडामोडी : २७ डिसेंबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 27 December 2019

सुप्रशासनात महाराष्ट्र दुसरा

देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकीय कारभाराचे मोजमाप करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुप्रशासन निर्देशांकास (गुड गव्हर्नस इंडेक्स) प्रारंभ करण्यात आला असून, त्याची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत तमिळनाडूने प्रथम क्रमांक पटकाविला असून, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहे. कार्मिक मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
सुप्रशासन निर्देशांकाच्या साह्याने राज्या-राज्यांच्या कारभाराची तुलना करण्यात येईल; तसेच प्रशासनात सुधारणा करण्यासाठी व उद्दिष्टाप्रत पोहोचण्यासाठी सुयोग्य धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. निर्देशांकासाठी काही घटक विचारात घेण्यात आले आहेत. उदा. मोजमाप करणे सोपे असावे, नागरिककेंद्री असावे; तसेच अंतिमत: सुधारणा हे उद्दिष्ट असावे आणि ते सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी अंमलबजावणी करता येण्यासारखे असावे.
*क्रमांक राज्य
एक तमिळनाडू, दोन महाराष्ट्र, तीन कर्नाटक, चार छत्तीसगड, पाच आंध्र प्रदेश, सहा गुजरात, सात हरियाणा, आठ केरळ, नऊ मध्य प्रदेश, दहा पश्चिम बंगाल, अकरा तेलंगण, बारा राजस्थान , तेरा पंजाब, चौदा ओडिशा, पंधरा बिहार, सोळा गोवा, सतरा उत्तर प्रदेश, अठरा झारखंड.

२०१९ मधील शेवटचे सूर्यग्रहण

२०१९ मधील शेवटचे सूर्यग्रहण २६ डिसेंबरला दिसले. वैज्ञानिक, खगोलप्रेमी आणि आबालवृद्धांनी केरळमधील विविध ठिकाणी गुरुवारी सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. राज्यातील उत्तरेकडील जिल्ह्यात हे ग्रहण स्पष्ट दिसले, तर कोट्टायम, थ्रिसूर, तिरुअनंतपूरम या जिल्ह्यात ग्रहण अंशत: पाहता आले. काही ठिकाणी मात्र, ढगांमुळे हे ग्रहण अनेकांना पाहता आले नाही.
केरळमध्ये अनेक ठिकाणी हा भौगोलिक आविष्कार पाहण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते.
राज्यात प्रथम कासारगोड येथील चेरुवथूरमध्ये पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले. त्यानंतर कोळीकोड आणि कन्नूरचा समावेश होता. वायनाडमध्येही नागरिकांमध्ये उत्साह होता. मात्र, तेथे ढगांनी निराशा केली. तेथे गेलेला कलपेट्टा या युवकाने सांगितले की, खूप अपेक्षेने आम्ही येथे आलो होतो. मात्र, ग्रहण पाहता आले नाही.
दुसरीकडे कुराविलंगडमधील अन्नमा थॉमस या ७५ वर्षीय आजींनी मात्र, दुर्मिळ सूर्यग्रहणाची साक्षीदार बनल्याने समाधान व्यक्त केले.

IAF चा पराक्रमी ‘बहादूर’होणार निवृत्त

mig 27

इंडियन एअर फोर्सचं अत्यंत घातक विमान MIG-27 आज सेवानिवृत्त होणार आहे. राजस्थानमधील जोधपूर एअरबेसवरुन मिग-२७ विमानांची तुकडी उद्या शेवटचं उड्डाण करणार आहे. मिग-२७ फायटर विमाने इंडियन एअर फोर्सच्या वैभवशाली परंपरेची साक्षीदार आहेत. मागच्या चार दशकापासून ही फायटर विमाने इंडियन एअर फोर्सचा कणा होती.
जोधपूर एअर बेसवर मिग-२७ ची शेवटची स्क्वाड्रन तैनात असून या स्क्वाड्रनमध्ये सात विमाने आहेत. “मिग-२७ चे स्क्वाड्रन आज आपले शेवटचे हवाई कौशल्य सादर करेल.
काय आहे मिग-२७ चे वैशिष्टय
– भारताने १९८० च्या दशकात तत्कालिन सोव्हिएत युनियन म्हणजे आताच्या रशियाकडून ही फायटर विमाने विकत घेतली होती.
– कारगिल युद्धातील मिग-२७ ची कामगिरी पाहून हे विमान चालवणाऱ्या फायटर वैमानिकांनी या विमानाला ‘बहादूर’ हे टोपण नाव दिले होते.
– शक्तीशाली इंजिन असलेल्या मिग-२७ मध्ये मोहिमेच्या गरजेनुसार काही बदल करता यायचे.
– कॉकपीटसह विमानातील अत्याधुनिक सिस्टिममुळे वैमानिकाला अत्यंत अचूकतेने शत्रूवर प्रहार करणे शक्य झाले.
– २० वर्षांपूर्वी १९९९ साली पाकिस्तान बरोबर लढल्या गेलेल्या कारगिल युद्धात मिग-२७ ने अत्यंत उत्कृष्ट भूमिका बजावली.
– कारगिल युद्धात हजारो फूट उंच शिखरावर दडून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर या विमानातून अत्यंत अचूकतेने बॉम्बफेक करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला आपल्या चौक्या सोडून पळ काढावा लागला.
– मागच्या काही वर्षात मिग-२७ च्या अपघातामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे २०१७ सालापासून भारतीय हवाई दलाने टप्प्याटप्प्याने या विमानांचा वापर बंद केला.
– मिग-२७ ने ऑपरेशन पराक्रमसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवायतींमध्ये सहभाग घेतला होता.
– आयएएफची २९ क्रमांकाची स्क्वाड्रन फक्त अपग्रेडेड मिग-२७ ऑपरेट करते. १० मार्च १९५८ साली ही स्कवाड्रन स्थापन झाली आहे.

चालकाची लेक कॅनडातील डिझायनिंग स्पर्धेत जगात तिसरी

वडील रात्रंदिवस तिच्या उज्वल यशासाठी टमटम चालवतात, घरची गरिबी. आई-वडिलांचे शिक्षणही जेमतेम. पण आपल्या वडिलांचे नाव जिद्दीने कॅ नडासारख्या विक सित देशात ज्या मुलीने मोठे केले ती म्हणजे सुषमा. आंतरराष्ट्रीय डिझाईनिंग स्पर्धेत जगात तिसरी आली आहे, ती मूळची कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील. आता तिला हाँगकोँग येथे दोन वर्षे उच्च शिक्षणासाठी जायचं आहे पण हाती पैसा नाही त्यासाठी तिचे वडील याचना करत आहेत.

कॅनडा येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी कोरल ड्रॉ इंटरनॅशनल स्पर्धा नुक त्याच पार पडल्या त्यात हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. कु मारी सुषमा अंबादास सोनवणे हिने स्पर्धेची तयारी क रून त्यात भाग घेतला आणि चक्क तिचा जगात तिसरा तर भारत देशात पहिला क्रमांक आला आहे. त्याबद्दल तिला एक लाख १७ हजार रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे.

Share This Article