Wednesday, May 25, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
  • Home
  • Article
  • Video
  • Download
  • Lokrajya
  • MPSC Advertisement
  • Book List
  • Syllabus
  • Become a Guest Writer
  • Contact Us
  • Copyright
ADVERTISEMENT

चालू घडामोडी : २८ जून २०२०

Chetan Patil by Chetan Patil
June 28, 2020
in Daily Current Affairs
1
current affairs 28 June 2020
WhatsappFacebookTelegram

Table of Contents

  • Current Affairs 28 June 2020
  • सहकारी बँका आरबीआयच्या निगराणीत; अध्यादेशाला मंजुरी
  • मायकल मार्टिन बनले आर्यलंडचे पंतप्रधान
  • NASA ने 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन बनवला व्हिडिओ

Current Affairs 28 June 2020

सहकारी बँका आरबीआयच्या निगराणीत; अध्यादेशाला मंजुरी

Co-operative banks monitored by RBI; Approval of the ordinance | सहकारी बँका आरबीआयच्या निगराणीत; अध्यादेशाला मंजुरी
  • सर्व सहकारी बँका आणि मल्टिस्टेट सहकारी बँका यांना रिझर्व्ह बँकेच्या निगराणीखाली आणणाऱ्या बँकिंग नियमन (दुरुस्ती) अध्यादेश, २०२० ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.
  • याबाबत अधिकृत निवेदनात शनिवारी सांगण्यात आले की, बँकिंग नियमन कायदा, १९४९ मध्ये अध्यादेश काढून दुरुस्ती करण्यात आली आहे. ही दुरुस्ती सहकारी बँकांवरही लागू आहे. यात असेही म्हटले आहे की, या अध्यादेशाचा असा हेतू आहे की, अन्य बँकांशी संबंधित आरबीआयकडे असलेले अधिकार सहकारी बँकांपर्यंत वाढवून कामकाजात सुधारणा करणे. ठेवीदारांच्या हिताचे रक्षण या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि सहकारी बँकांना मजबूत करण्यात येणार आहे.
  • यात असेही म्हटले आहे की, या दुरुस्तीचा परिणाम राज्य सहकारी समितीच्या सध्याच्या अधिकारांवर होणार नाही. तसेच, कृषी पतसंस्था व सहकारी समित्यांवर ही दुरुस्ती लागू असणार नाही. कारण, यांचा उद्देश कृषी विकासासाठी दीर्घकालीन कर्ज देणे हा आहे व या संस्था बँक, बँकर व बँकिंग यासारख्या शब्दांचा वापर करीत नाहीत, तसेच चेक देत नाहीत.
  • या निवेदनात असेही म्हटले आहे की, या अध्यादेशातून बँकिंग नियमन अधिनियमाच्या कलम ४५ मध्ये दुरुस्ती केली आहे. देशात १४८२ शहरी सहकारी बँका आणि ५८ मल्टिस्टेट सहकारी बँका आहेत. त्यांच्याकडे ८.६ कोटी ठेवीदारांची जवळपास ४.८५ लाख कोटी रुपयांची रक्कम आहे. पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को. ऑप. बँकेसह काही सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा समजला जात आहे.

मायकल मार्टिन बनले आर्यलंडचे पंतप्रधान

फियाना फेल पार्टीचे नेते मायकल मार्टिन आर्यलंडचे नवे पंतप्रधान म्हणून विजयी झाले आहेत. संसदेच्या एका विशेष बैठकीत त्यांची निवड झाली. मार्टिन यांना ९३ मते मिळाली. मार्टिन आपल्या पक्षात बरोबरच इतर दोन पक्ष फाईन गेल व ग्रीन पार्टीच्या आघाडीचे नेतुर्त्व करतील

deepsthabha advt deepsthabha advt deepsthabha advt
ADVERTISEMENT

NASA ने 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन बनवला व्हिडिओ

NASA made a video of watching the sun for 10 years, making a splash on social media | Video : NASA ने 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन बनवला व्हिडिओ, सोशल मीडियावर धुमाकूळ
  • अमेरिकेतील जगविख्यात स्पेस एजन्सी नासाने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हायरल व्हिडिओत नासाच्या सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरीने तब्बल 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन या व्हिडिओचे चित्रीकरण केले आहे.
  • या कालावधीत ऑब्जर्वेटरीने अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे टिपली आहेत. त्यातूनच सूर्य ग्रहासंबंधातील काही महत्वाची माहितीही नासाने शेअर केली आहे. नासाने शेअर केलेल्या माहितीचा अभ्यास केल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
  • नासाच्या सोलर ऑब्जर्वेटरीने 10 वर्षे सूर्य ग्रहावर नजर ठेवली होती, त्यासोबतच त्याने सूर्याच्या 45 कोटी हाय-रेज्युलेशनचे छायाचित्रे घेतली आहेत. तसेच 2 कोटी गीगाबाईट डेटाही जमा केला आहे. नासाच्या एका स्टेटमेंटनुसार, टाईम लैप्स व्हिडिओ जारी करण्यात आला असून टाईम लैप्स फुटेजमध्ये सूर्याच्या 11 वर्षांपासून सुरु असलेल्या सौर चक्राच्या गतीमधील वाढ आणि घट दाखविण्यात आली आहे.
  • या गतीमानतेमुळे शास्त्रज्ञांना आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्यांच्या कामकाजाबद्दलची अधिक प्रभावीपणे माहिती घेता येईल. तसेच, सौर मंडलास कशाप्रकारे प्रभावित करतात याचीही माहिती मिळाली आहे. नासाच्या संशोधनानुसार, सूर्याचे चुंबकीय क्षेत्र एका चक्रातून जाते, त्यास सौर चक्र असे म्हणतात. दर ११ वर्षांनी सूर्याचे चुंबकीय क्षेत्र पूर्णपणे बदलले जाते.

स्पर्धा परीक्षांचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.

Tags: chalu ghadamodiCurrent AffairsMPSC Current Affairsचालू घडामोडी
SendShare118Share
Next Post
DRDO CVRDE Recruitment 2020

DRDO DRDE Recruitment 2020

current affairs 29 june 2020

चालू घडामोडी : २९ जून २०२०

current affairs 30 june 2020

चालू घडामोडी : ३० जून २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group