⁠  ⁠

महाराष्ट्राचा भूगोल – खनिज संसाधने व ऊर्जा संसाधने

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

Maharashtracha Bhugol – खनिज संसाधने व ऊर्जा संसाधने
Geography of Maharashtra (Natural Resources and Energy)


खनिज संसाधने

आर्थिकदृष्ट्या महत्त्व असलेले भू-पदार्थ, जे जमिनीतून खणून काढावे लागतात, त्यांना खजिन म्हणतात.
मूलत: खडक हे खनिजांचे मिश्रण असते. त्यामुळे कोणत्याही प्रदेशात कोणती ना कोणती तरी खनिजे असतातच.
खनिजांचे धातू व अधातू असे वर्गीकरण केले जाते. या दोनही प्रकारच्या खनिजांचा वेगवेगळ्या उद्योगांत कच्चा माल म्हणून उपयोग केला जातो.

1.लोहखनिज

लोहखनिज महत्त्वाचे खनिज आहे. इमारत बांधणी, यंत्रे, फर्निचर, वाहतुकीची साधने, इलेक्ट्रिकल्स मध्ये लोहखनिजाचा वापर केला जातो.
लोहखनिज अशुद्ध स्थितीमध्ये सापडते. हमेटाईट, मॅग्रेटाईट, लिमोनाईट व सिडेराईट हे लोहखनिजांचे प्रमुख प्रकार आहेत.

चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत लोहखनिजाचे साठे आहेत. तर दक्षिण महाराष्ट्रात सिधुदुर्ग जिल्ह्यात लोहखनिजाचे साठे आहेत.

2. बॉक्साईट –

अ‍ॅल्युमिनियम वजनाने हलके व न गंजणारे खनिज आहे. ते उत्तम वीजवाहक आहे. बॉक्साईट पासून अ‍ॅल्युमिनियम मिळवले जाते.अ‍ॅल्युमिनियम तांब्यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे त्याचा वापर विद्युत उपकरणात करतात.तसेच त्याचा वापर घरगुती भांडी तयार करणे, मोटारीचे सुट्टे भाग, विमाने, रेल्वेचे डब्बे, खिडक्या, दोर तयार करण्यासाठी केला जातो. तसेच रसायन उद्योग, तेल शुद्धीकरण उद्योग, सिमेंट, लोह, पोलाद उद्योग यात अ‍ॅल्युमिनियम वापरतात.

बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने जांभ्या खडकाच्या प्रदेशात आढळतात.सह्याद्रीमधील साठे उच्च दर्जाचे आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांत बॉक्साईटचे उत्पादन होते.

3. मँगेनीज –

मँगेनीज व लोह एकत्र असतात. त्यास फेरो मँगेनीज म्हणतात. मँगेनीज धातू शेंदरी काळ्या रंगाचा असतो.सामान्यपणे एक टन पोलाद उत्पादनासाठी 10 किलोगॅ्रम मॅगनीजची आवश्यकता असते. या खनिजाचे 95 टक्के उत्पादन लोह पोलाद उत्पादनात वापरले जाते.

मँगेनीजचा वापर चिनीमाती मिळवण्यासाठी, ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी, रंग, जंतुनाशके व बॅटरी उद्योगात केला जातो. दागिन्यांना डाग देण्यासाठी सुद्धा मँगेनीजचा वापरर करतात. तसेच कापड, उद्योग, काडेपेटी उद्योग, फोटोग्राफी, काचेवर रंग देण्यासाठी मँगनीज वापरतात.

महाराष्ट्रात मँगेनीज प्रमुख उत्पादन भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत घेतले जाते.


ऊर्जा संसाधने

१. दगडी कोळसा

– महाराष्ट्रातील दगडी कोळसा हे महत्त्वाचे खनिज आहे.
– दगडी कोळशाचा वापर खत व रसायन उद्योगात कच्चा माल तर रेल्वे वाहतुकीसाठी इंधन म्हणून केला जातो.
– अ‍ॅन्थ्रासाईट, बिट्युमिनस, लिप्नाईट व पीट हे दगडी कोळशाचे प्रमुख प्रकार आहेत.
– महाराष्ट्रात चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांत दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
– कोराडी, पारस, तुर्भे इत्यादी महत्त्वाची औष्णिक विद्युत केंद्रे आहेत.

२. खनिज तेल व नैसर्गिक वायू

– कार्बन व हैड्रोजन यांच्या मूलद्रव्याने खनिज तेल तयार झाले आहे. ते वालुकामय प्रदेशात किंवा चुनखडकात सापडते.
– महाराष्ट्रात मुंबईच्या वायव्येस अरबी समुद्रात ‘मुंबई हाय’ येथे खनिज तेलाचा साठा 1973 मध्ये सापडला. हा देशातील प्रमुख साठा आहे.
– याच क्षेत्रात नैसर्गिक वायू देखील सापडतो. नैसर्गिक वायूचा उपयोग घरगुती इंधन, खत, कारखाने व औष्णिक वीज केंद्रात केला जातो.
– तसेच कृत्रिम रबर तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी देखील नैसर्गिक वायू उपयुक्‍त आहे.

Share This Article