⁠  ⁠

महाराष्ट्राचा भूगोल – वने व वन्य प्राणी

Rajat Bhole
By Rajat Bhole 4 Min Read
4 Min Read

Maharashtracha Bhugol – वने व वन्य प्राणी
Geography of Maharashtra (WildLife)

वने व वन्य प्राणी

  • वन हे खूपच महत्वाचे जैविक नैसर्गिक संसाधन आहे.
  • पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदेशाचा 1/3 भाग वनाखाली असावा असे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील वन प्रकार

महाराष्ट्रात वनांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
1) उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने
2) उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने
3) उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने
4) उष्ण प्रदेशी काटेरी वने
5) खारफुटीची वने

1) उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने

  • ही वने महाराष्ट्रात 2000 मिमी पेक्षा जास्त प्रर्जन्य असणार्‍या तसेच वार्षिक सरासरी तापमान 20 अंश सें. ते 30 अंश सेल्सियम असलेल्या प्रदेशात आढळतात.
  • ही वने रुंदपर्णी असून वृक्षांची उंची 60 ते 65 मीटरपर्यंत असते.
  • या वनांमध्ये किंजल, साग, साल, कुसुम, अंजन, हिरडा, बेहडा, इत्यादी वनस्पती आळतात.
  • ही वने आर्थिकदृष्ट्या महत्वाची आहेत.
  • या वनस्पतींच्या लाकडांचा उपयोग शेतीची अवजारे तयार करण्यासाठी व घरे बांधणीसाठी होतो.
  • झाडांची पाने, फळे, फुले यांचा उपयोग औषधीयुक्‍त घटक म्हणून केला जातो.
  • सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्याच्या पूर्व भागात व कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात ही वने आढळतात.

2) उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने

  • ही वने सामान्यपणे 1000 ते 2000 मिमी पर्जन्य असणार्‍या तसेच सरासरी तापमान 200 ते 300 सेल्सियम दरम्यान असलेल्या प्रदेशात आढळतात.
  • ही वने पावसाळ्यात वाढतात तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला यांची पाने गाळतात.
  • झाडांची उंची 30 ते 40 मीटर असते.
  • या वनामध्ये साल, साग, चंदन, पळस, कांचन, अर्जुन यासारखे वृक्ष आढळतात.
  • ही वने भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांत आढळतात.

3) उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने

  • ही वने सामान्यपणे 500 ते 1000 मिमी पर्जन्य असणार्‍या व सरासरी 35 अंश ते 40 अंश सेल्सियम तापमान असणार्‍या प्रदेशात आढळतात.
  • येथे झाडांची उंची कमी असते.
  • वने अतिशय विरळ असतात. वृक्षांना काटे असतात. बेल, पळस, अंजन, तेंदू हे वृक्ष या वनात आढळतात.
  • ही वने जळगाव, धुळे, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, इत्यादी जिल्ह्यात आढळतात.

4) उष्ण प्रदेशीय काटेरी वने

  • महाराष्ट्रात 500 मिमी पेक्षा कमी पर्जन्य असणार्‍या प्रदेशात ही वने आढळतात. उन्हाळे अति कोरडे असतात.
  • सामान्यपणे महाराष्ट्राच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात या प्रकारची वने आढळतात.
  • वनस्पतींना पोषक हवामान नसल्याने त्यांची पुरेशी वाढ होत नाही. या वनस्पती खुरट्या व काटेरी असतात. उन्हाळ्यात यांची पाने गळतात.
  • बोर, बाभूळ, निंब, खैर, हिरडा, निवडुंग इत्यादी वनस्पती या वनात आढळतात.
  • बाभूळ, निंब यांच्या लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे तयार करण्यासाठी तर सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी केला जातो.
  • बाभूळ व निंबाचे लाकूड इमारती बांधकामासाठी उपयुक्‍त ठरते. कोरफड औषधी म्हणून उपयुक्‍त आहे.

5) खारफुटीची वने

  • महाराष्ट्राच्या किनार्‍यालगतच्या भागात भरती व ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान तसेच खाड्यांच्या मुखाजी दलदलयुक्‍त भूमीवर असलेल्या वनांना खारफुटीची वने म्हणतात.
  • या वनामध्ये कांदळ व तिवर जातीच्या वनस्पती आढळतात.

वनसंवर्धन

जमिनीची धूप कमी करण्यासाठी, पर्जन्यमान सुधारण्यासाठी, स्वच्छ व निरोगी हवेसाठी, पर्यावरणीय संतुलनासाी, भूमिगत पाण्याची पातळी टिकवण्यासाठी, वन्य प्राण्यांच्या संरक्षासाठी, विविध वनोत्पादनासाठी, आदिवासी लोकांचे वस्तीस्थान सुरक्षित राखण्यासाठी, वनांवर आधारित उद्योगांना कच्चा माल पुरवण्यासाठी वनसंपत्तीची आवश्यकता आहे.

  • राष्ट्रीय धोरणानुसार व शास्त्रीय दृष्टीकोनातून राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 33 टक्के क्षेत्र जंगलाखाली असावे.
  • सन 2006 पासून राज्यसरकारने ‘संत तुकाराम वनग्राम योजना’ सुरु केली. या योजनेअंतर्गत अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण आणि वनसंपत्तीचे संरक्षण केले जाते, तसेच वनांच्या व वन्य जीवांच्या महत्वाबाबत जनजागृती केली जाते.

महाराष्ट्रातील वन्यप्राणी संसाधन –

  • वन्य प्राण्यांचे संरक्ष व पर्यटनाचा विकास असा दुहेरी दृष्टीकोन ठेवून शासनाने अनेक उद्योग व अभयारण्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागात विकसीत केलेली आहेत.
  • पश्‍चिम घाट व पूर्व महाराष्ट्र हे दोन प्रदेश वन्य प्राण्यांच्या दृष्टीने विशेष महत्वाचे आहेत.
  • राज्यात मेळघाट, ताडोबा, पेंच व सह्याद्री येथे चार व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी पहिले तीन पूर्व महाराष्ट्रात असून चौथा पश्‍चिम भागात आहे.
  • व्याघ्र प्रकल्पाशिवाय राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट प्राण्यांसाठी अभयारण्ये स्थापन केलेली आहेत. उदाहरणार्थ, कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य.
  • पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर वनक्षेत्रात आढळणारी महाकाय खार-शेकरु हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.

Share This Article