Wednesday, March 3, 2021
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्पर्धा परीक्षा भूगोल

Mission MPSC by Mission MPSC
February 15, 2018
in Geography
5
mpsc-Geography-unique-acadamy-vikas-girase
WhatsappFacebookTelegram
Join WhatsApp Group
ADVERTISEMENT
Advertisements

आजच्या या आपल्या लेखात आपण भूगोल या विषयाचा आढावा घेणार आहोत. त्या सोबतच भूगोल या विषयाचे घटक-उपघटक व मागील आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षांना आलेल्या प्रश्‍नांचा देखील आढावा घेणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 च्या दृष्टीने भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. भूगोल या विषयांचे सर्वसाधरणपणे 15 ते 18 प्रश्‍न विचारले जात असतात. भूगोल या विषयाचा अभ्यास कसा करावा? संदर्भ साहित्य कोणते वापरावे? या विषयाचे सराव प्रश्‍नाचा देखील आपण समावेश केला आहे. भूगोल हा विषय नकाशे, मूलभुत माहिती, संकल्पना, सिध्दांत यांच्याद्वारे समजल्यास व त्याचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास केल्यास तो अतीशय सोपा होतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा या दृष्टीने

भूगोल या विषयाचे तीन मुख्य घटकांमध्ये वर्गीकरण पुढील प्रमाणे…

1.जगाचा भूगोल 2.भारताचा भूगोल 3.महाराष्ट्राचा भूगोल

या तीन मुख्य घटकांचे पुढील उपघटकांमध्ये वर्गीकरण…

1. जगाचा भूगोल

  • प्राकृतिक भूगोल – भूरूपशास्त्र, हवामान शास्त्र, सागर शास्त्र, पर्यावरण भूगोल, जैव भूगोल
  • नदया, पर्वत, शिखरे, पठार, सरोवरे, बेटे, वाळवंटे
  • वार्‍याचे कार्य, सागरी लाटाचे कार्य, भुमिगत जालाचे कार्य, नद्यांचे कार्य, हिमनद्याचे कार्य
  • जगातील विभाग, खंड, महासागर, जगातील आदीवासी जमाती, स्थलांतरीत शेती, जगातील नैसर्गिक प्रदेश

2. भारताचा भूगोल

  • राजकीय भूगोल
  • प्राकृतिक भूगोल – पर्वत, शिखरे, खिंडी, हिमनद्या
  • हवामान – पर्जन्य, हवामान विभाग
  • खनिजसंपत्ती
  • मृदा
  • वने
  • जणगणना/लोकसंख्या/जमाती
  • कृषी – पशुपालन, स्थलांतरील शेती प्रकार
  • उत्सव, सण, विविध आदीवासी जमाती
  • वाहतुक दळणवळण

3. महाराष्ट्राचा भूगोल

  • प्रशासकीय विभाग
  • प्राकृतिक विभाग – कोकण किनारपट्टी, सहयाद्री पर्वत, महाराष्ट्र पठार
  • हवामान
  • नद्या
  • मृदा
  • खनिजसंपत्ती
  • वने
  • लोकसंख्या
  • वाहतुक, दळणवळण, पर्यटन

भूगोल या विषयाचे पूर्व परीक्षेला असलेले महत्त्व
भूगोल हा विषय पूर्व परीक्षेच्या दृष्टीने तसेच मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. साधारणतः या विषयाचे पूर्व परीक्षेला 15 ते18 प्रश्‍न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला भूगोलाच्या प्रश्‍नांचा रोख कोणत्या प्रकारचा आहे ते समजुन घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला मागील प्रश्‍नपत्रिकांचा अभ्यास करावा लागेल. प्रश्‍नांचे स्वरूप पाहता भूगोल या विषयात 15 ते 18 पैकी 14 ते 15 मार्क मिळवता येतात. त्यामुळे हा विषय आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हमखास मार्क देणारा विषय आहे.

भूगोल या विषयाचे 2013 ते2017 पर्यंत सर्वसाधारणपणे मुख्य घटकानुसार विश्‍लेषण पुढील प्रमाणे.

भूगोल विषयाचा अभ्यास कसा करावा ?

मागील प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण पाहता भूगोल या विषयाचे सर्वाधिक प्रश्‍न हे जगाचा व भारताचा भूगोल वर विचारलेले आहेत. सध्या त्यातच सर्वात जास्त प्रश्‍न प्राकृतिक भूगोल वर विचारण्यात आलेले आहेत. भूगोल विषयाचा अभ्यास सुरू करतांना सुरूवातीस 5 ते 12 शालेय पाठयक्रम पुस्तके संकल्पना समजुन वाचावे. त्यानंतर आयोगाला आलेल्या प्रश्‍नांचे विश्‍लेषण करावे. या विषयात साधारणतः संकल्पना, नकाशे, तक्ते, आकृत्या या वर अधिक भर द्यावा. वस्तुनिष्ठात्म दृष्टया अभ्यास करतांना काही गोष्टी Factual असल्यामुळे नकाशाद्वारे तसेच काही short tricks तयार कराव्यात. तसेच जगाचे व भारताचे Maps सोबतीला असु द्यावे. Maps भरून अभ्यास केल्यास अभ्यास सोपा होतो. सध्याचा प्रश्‍नांचा ट्रेंड पाहता चालू घडामोडींवरही विशेष भर द्यावा. (उदा. अंतराष्ट्रीय जललवाद, हवामान बदल संदर्भातील प्रश्‍न) जगाच्या प्राकृतिक भूगोलातील पर्वत, शिखरे, सरोवरे, बेटे, महासागर, खाडया, आखात, पठारे, नद्या यावर विशेष भर द्यावा. व विशेषतः भारताच्या व महाराष्ट्राचा भूगोल मधील घटकांचा अभ्यास करतांना पुढील मुद्यांवर भर द्यावा उदा. नद्या, पर्वत, शिखरे, मैदाने, खाडया, त्रिभुज प्रदेश, सरोवरे, सण, उत्सव, क्रांती, लोकसंख्या, दळण-वळण

राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारले गेलेले प्रश्‍न व त्याचे विश्‍लेषण पुढील प्रमाणे:

1. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ….. या देशांमध्ये वसले आहे. (राज्यसेवा पूर्व 2016)
1 ) पेरू आणि बोलव्हिया 2)अर्जेटिया आणि चिली
3) इक्वेडॉर आणि कोलबिया 4)चिली आणि बोलेव्हिया

स्पष्टीकरण : उत्तर क्र : पर्याय 1

  • पेरू व बोलिव्हिया या देशांच्या सीमेवर, अ‍ॅडीज पर्वतरांगेमध्ये टिटिकाका सरोवर आहे. समुद्रसपाटीपासुन 3812 मी उंचीवर स्थित हे सरोवर जगातील सर्वात उंचीवरील सरोवर आहे. जलवाहतुकीसाठी ही या सरोवराचा उपयोग केला जातो.
  • दक्षिण अमेरिकेतील पाच प्रमुख नद्या व वीस लहान नद्या टिटिकाकाला मिळतात परंतु अत्यंत उंचीवरील तीव्र सुर्यप्रकाश व जोरदार वारा यामुळे टिटिकाकाच्या 90 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते तर 10 टक्के पाणी बोलिव्हियातील दुसर्‍या सरोवराला मिळते.
    संदर्भ : अ‍ॅटलास, इंटरनेट

2. जोडया लावा (राज्यसेवा पूर्व परीक्षा -2017)
खाडी स्थळ
अ. 10 डिग्री 1. लहान अंदमान मोठया अंदमान पासुन विलग करते
ब. 8 डिग्री 2. मीनीकॉय लक्षद्विप पासुन विलग करते
क. 9 डिग्री 3. अंदमान निकोबार पासुन विलग करते
ड. डंकन बोळ(पास) 4. मीनीकॉय मालदीव पासुन विलंग करते.
अ ब क ड
1) 3 2 4 1
2) 3 4 2 1
3) 3 4 1 2
4) 4 3 1 2
स्पष्टीकरण – उत्तर क्र. – पर्याय 2
म्यानमार व अंदमान यांच्यामध्ये कोको चॅनल आहे.
अंदमान-निकोबार बेटे –
या द्विपसमुहात 572 बेटे आहेत. त्यापैकी 38 बेटावर मानवी वस्ती आहेत. बॅरन हा मध्य अंदमान मधील जागृत ज्वालामुखी आहे. उत्तर अंदमान मधील सॅडल हे सर्वात उंच शिखर आहे.
लक्षद्विप बेटे –
लक्षद्विप हा 36 बेटांचा समुह आहे. हा बेट समुह प्रवाळांमुळे निर्माण झालेला आहे. मीनीकॉय यातील सर्वात मोठे बेट आहे.

3. खालीलपैकी कोणते पठार कललेले नाही ? (राज्यसेवा पूर्व परीक्षा -2015)
1)दख्खनचे पठार 2)अरेबियाचे पठार 3)ब्राझीलचे पठार 4)तिबेटचे पठार
स्पष्टीकरण – उत्तर क्र.- पर्याय 4
पठार – आसपासच्या प्रदेशापेक्षा उंच व माथ्याकडे सपाट भाग असलेले भुरूप म्हणजे पठार होय त्याचे सर्व बाजूचे उतार तीव्र असणे गरजेचे आहे. दख्खनचे पठार आग्नेयेकडे कललेले आहे. ब्राझीलचे पठार ईशान्येकडे कललेले आहे. अरेबियाचे पठार पूर्वेकडे कललेले आहे. अंतर्गत प्रक्रियांनी निर्माण झालेले तिबेटचे पठार जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.(450 मी) विस्तार 25 लक्ष चौ.किमी असुन ते एक समान पातळीवर वसलेले आहे.

भूगोल या विषयाच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारे अभ्यास साहित्य पुढील प्रमाणे –

शालेय पाठयक्रम पुस्तके – 5 वी ते 12 वी
NCERT- 6 वी ते 12 वी पुस्तक

द युनिक प्रकाशनाची पुस्तके –
1. संपूर्ण भूगोल -राहुल पाटील/विकास गिरासे Buy Now
2. 5 वी ते 12 शालेय पाठयक्रमावर आधारित इतिहास व भुगोल -कपिल हांडे/राहुल पाटील Buy Now
3. NCERT – मराठी सारांश – कपिल हांडे/विभोर बोठे Buy Now
इतर संदर्भ पुस्तके –
1. भारत/जग/पर्यावरण – ए.बी. सवदी Buy Now
2. Physical Geography – G.C. Liong

अभ्यासासाठी सराव प्रश्‍न

प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्‍या खिंडीचा योग्य क्रम लावा.
1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल 2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल
3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी 4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल

प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.
अ. पृथ्वीचे परीभ्रमण ब. पृथ्वीचे परिवलन
क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे
1) अ,ब 2) ब, क, ड 3) सर्व कारणीभुत घटक 4) अ,ब व क

प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.
अ.उत्तर विषवृत्तीय प्रवाह ब.कॅरीबियन प्रवाह क.कॅलीफ ोर्निया प्रवाह ड. क्यरोसिवा प्रवाह
1) अ,ब, क 2) अ, ब, ड 3) अ,ब,ड 4) वरील सर्व

प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.
अ. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.
ब. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.
क. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. व पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.
1) अ,ब, क 2) अ 3) अ,ब 4) वरील सर्व

प्र.5. वार्‍याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.
अ.इयूजेन ब.यारदांग क.भुछत्र खडक ड.द्विपगिरी
इ.कंकतगिरी/केम्स ई तरंग घर्षितमंच उ. भुस्तंभ
1) सर्व योग्य 2) सर्व अयोग्य 3) क, ड, इ, ई, उ 4) इ, ई

प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.
अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो.
ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.
क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.
1) अ 2) ब 3) क 4) यापैकी नाही

प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?
अ. ऑस्टे्रलिया ब. नामिबिया क. ब्राझिल ड. चिली
1) अ,ब,क 2) ब व क 3) अ,ब, क 4) सर्व योग्य

प्र.8. पुढील पठार पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.
अ. छोटा नागपूर ब.माळवा क. बुंदेलखंड ड. बाघेलखंड
1) ब,क,ड,अ 2) क,ब,ड,अ 3) अ,क,ड,ब 4) ब,क,अ,ड

प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)
अ. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.
ब. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.
क. सर्वाधिक साक्षरता मुंबई उपनगर या जिल्हयाची
आहे.
1) अ व ब 2) ब व क 3) अ व क 4) सर्व योग्य

प्र.10. अ,ब,क व ड यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.

geography-mpsc-question2

1. चिरोली 2. गरमसूर 3. गाळणा 4. मुदखेड
अ     ब      क     ड
1)    3     4      2     1
2)    3     4      1     2
3)    1     2      3     4
4)    1     2      4    3

उत्तरे –

1 – 2

2 – 3

3- 3

4- 1

5- 4

6 – 4

7 – 4

8 -1

9-4

10-1

लेखक – प्रा.विकास गिरासे, द युनिक अ‍ॅकॅडमी
Email – [email protected]
Mobile – 7721065750

स्पर्धा परीक्षांविषयी नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Tags: GeographyThe Unique AcademyThe Unique Academy PuneVivek Girase
SendShare933Share
Next Post
narendra-modi-daos

Current Affairs 24 January 2018

lokrajya-january-2018-cover

Lokrajya January 2018

vinda-karandikar

Current Affairs 25 January 2018

Comments 5

  1. Tejashwini harde says:
    2 years ago

    Sir mala talathi exam preparation karta .plz suggest books name & author names

    Reply
  2. Tejas sartape says:
    2 years ago

    Khup chan

    Reply
  3. Narayan Shrirame says:
    3 years ago

    Sirr qsn khup imp ahet….Sti preparation mii konte book refer karu…plz sir Suggest mi….

    Reply
  4. Gaurav Gurve says:
    3 years ago

    Khup Chan Sir…

    Reply
  5. प्रशांत पाटील says:
    3 years ago

    लेख छान आहे.प्रश्ण ची पातळी चांगली आहे

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
download-free-lokrajya-PDF
MPSC-PSI-STI-ASO-combine-exam-2020

Recent News

  • 12वी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; ESIC मध्ये UDC पदांच्या ६५५२ जागा
  • ESIC कर्मचारी राज्य बीमा निगम पुणे येथे विविध पदांच्या १५ जागा
  • HURL हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदांच्या १५९ जागांसाठी भरती

Category

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group