⁠  ⁠

गवंडी कामगाराच्या लेकीने मिळविले MPSC परीक्षेत घवघवीत यश

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story आपली स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द असेल तर यश देखील मिळतेच. पण त्यासाठी मेहनत गरजेची असते. याच मेहनतीच्या जोरावर कोमल सावंत हिने राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर मजल मारली आहे. कोमल ही मूळची माण तालुक्यातील मार्डी गावची कन्या.

कोमलचे शिक्षण पहिली ते दहावी मार्डी गावामध्येच झाले. पुढे बारावी ते बी. एस्सीचे शिक्षण दहिवडी कॉलेजमधून पूर्ण केले. नंतर २०१८ मध्ये तिने राज्य लोकसेवा आयोगाच्या अभ्यासाला सुरुवात केली.पण घरची परिस्थिती बेताची होती.

हिचे वडील अंकुश नामदेव सावंत यांनी गवंडी काम करतात.तशीच घरची परिस्थिती ही बेताची होती. त्यांच्या उदरनिर्वाहाचे काहीच साधन नव्हते. तरी देखील आपल्या मुलाने मोठे व्हावे ही आई – वडिलांची इच्छा होती.आई आशा सावंत यांनी तिला कोणत्याही घर कामात न गुंतवता पूर्ण वेळ अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन प्रोत्साहित केले. तिने देखील स्वतः अभ्यास करून हे यश मिळवले हे खूप कौतुकास्पद आहे.

ती २०१९ मध्ये पहिल्या प्रयत्नात दोन गुणांनी अपयश ठरली. परंतू खचून न जाता जिद्दीने अभ्यास करून २०२०च्या परीक्षेसाठी अभ्यास केला. आधी झालेल्या चूका त्यावर उपाय आणि अभ्यास हे लक्षात ठेवले. त्यामुळेच, तिची लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातून अनुसूचित जाती मुलींमधून अनुक्रमे चौथा व दुसरा क्रमांक मिळवत यश संपादन केले.

Share This Article