• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Thursday, August 11, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

शिक्षण थांबवून चार वर्षे घरी, एमपीएससीत मुलींत राज्यात प्रथम; स्वाती बनली उपजिल्हाधिकारी

Tushar Bhambare by Tushar Bhambare
February 17, 2019
in Success Stories
2
swati-dhabade-mpsc-first
WhatsappFacebookTelegram

पुणे- मुलगी शिक्षण घेऊन पुढे काय करणार, त्यापेक्षा तिने घरी बसून घरातील कामे शिकावीत आणि लग्न करून सासरी जावे, अशी मानसिकता अनेक ठिकाणी पाहण्यास मिळते. अशाच परिस्थितीत बारावीनंतर कुटुंबीयांनी शिक्षण थांबवल्याने चार वर्षे घरी बसलेली मुलगी पुन्हा जिद्दीने शिक्षणास सुरुवात करते आणि पदवीधर होऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देत मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवते. ही किमया साधली आहे पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेजवळील माळवाडी गावातील स्वाती दाभाडे या तरुणीने. स्वातीने नुकत्याच झालेल्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी पद मिळवले आहे.

स्वातीचे वडील किसन भगवान दाभाडे व आई लक्ष्मी किसन दाभाडे हे अल्पशिक्षित असून शेती करतात. तर, तिची बहीण सुजाता मुळीक हिचे बारावीपर्यंतच शिक्षण झाले असून भाऊ विशालने आयटीआय करत खासगी कंपनीत नोकरी सुरू केली आहे. पहिली ते चाैथीपर्यंतचे शिक्षण स्वातीने जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले व त्यानंतर तळेगाव येथील रामभाऊ परुळेकर विद्यालयात तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अकरावी आणि बारावी इंद्रायणी महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पूर्ण केली व नेहमीप्रमाणे वर्गात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला. मात्र, त्यानंतर तिच्या वडिलांनी मोठी मुलगी सुजाता हिला बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्याने स्वातीलादेखील पुढील शिक्षण न देता घरी बसवण्यात आले. यादरम्यान, घरीच स्वातीने लहान मुलांचे क्लास घेणे सुरू करून कुटुंबीयांना हातभार लावण्यास सुरुवात केली. मात्र, तिच्यासोबतच्या इतर मैत्रिणी शिक्षण घेऊन पुढे जात असल्याचे पाहून घरी बसून आपण काय करतो, असा प्रश्न तिला पडला. त्यामुळे वडिलांच्या पुन्हा मागे लागून तिने पुन्हा शिक्षण सुरू केले. मात्र, गावातील महाविद्यालयात विज्ञान शाखेचा पुढील अभ्यासक्रम नसल्याने तिने कॉमर्सला प्रवेश घेत बीकॉम पदवी संपादन केली व कुटुंबातील पहिली पदवीधर झाली. दरम्यान, बीकॉमच्या परीक्षेतही टॉपर आल्याने वडिलांच्या मित्राने मुलीचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्यास सांगितले व त्यांची मानसिकता तयार केली. जीएसटी अधिकारी सुनील काशिद यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर स्वाती स्पर्धा परीक्षेकडे वळली. त्यानंतर तिने यश प्राप्त केले.

चार वर्षे वाया गेल्याचे वडिलांनाही दु:ख झाले
मुलींचे आयुष्य मर्यादित नसून त्यांना संधी दिल्यास त्या पुढे जाऊ शकतात, हे मला अनुभवावरून दिसले. नायब तहसीलदारपदी निवड झाल्यावर वडिलांनाही मुलीची चार वर्षे वाया घालवल्याचे दु:ख झाले व त्यानंतर त्यांनी प्रोत्साहन दिले.

स्वाती दाभाडे


Tags: mpsc success storyswati dabhade
SendShare94068Share
Tushar Bhambare

Tushar Bhambare

Related Posts

Minaj Ghani Mulla success story
Success Stories

Success Story : शेतात काबाडकष्ट करून जिद्दीच्या जोरावर उपजिल्हाधिकारी झालेले मिनाज मुल्ला

August 8, 2022
raghavendra sharma
Inspirational

कधी इंटरनेटवरून तर कधी मित्रांकडून नोट्स मागवून केली UPSC क्रैक, वाचा UPSC Topper राघवेंद्र शर्मा यांची कहाणी

June 8, 2022
pramod choughule
Inspirational

टेम्पो चालकाचा मुलगा MPSC परीक्षेत राज्यात पहिला

April 30, 2022

Comments 2

  1. Rajesh Hegu says:
    3 years ago

    Congratulations to tai

    Reply
  2. Vikram says:
    3 years ago

    abhinandan

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pandharpur

पंढरपूर नागरी सहकारी बँकेत 12 वी उत्तीर्णांना संधी.. असा करा अर्ज?

August 10, 2022
THDC

THDCIL Recruitment : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 109 जागांसाठी भरती

August 10, 2022
Defense Ministry

संरक्षण मंत्रालयांतर्गत मुंबईत ‘या’ पदासाठी भरती, 75,000 रुपये पगार मिळेल

August 10, 2022
SAI Recruitment

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या 138 जागांसाठी भरती

August 10, 2022
Current Affairs 10 August 2022

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2022

August 10, 2022
job

केंद्र सरकारच्या ‘या’ कंपनीमध्ये 396 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधी..

August 9, 2022
ADVERTISEMENT
  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group