⁠  ⁠

चालू घडामोडी : ०२ मार्च २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

नऊ वर्षाच्या रित्विकाने सर केले माउंट किलीमंजारो शिखरritwika shree

आंध्रप्रदेश येथील ९ वर्षाच्या रित्विका श्री, माउंट किलीमंजारो सर करणारी जगातील दुसरी सर्वात लहान आणि आशियाची सर्वात लहान मुलगी बनली आहे.
तिने तिच्या वडिलांसोबत हा विक्रम साध्य केला, जे तिचे मार्गदर्शक देखील आहेत.
रित्विकाने समुद्रसपाटीपासून ५,६८१मीटर उंचीवर असलेल्या गिलमन पॉईंटपर्यंत मजल मारली. टांझानिया येथील माउंट किलीमंजारो हे आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आहे.
अनंतपूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी गंधम चंद्रुडू यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये रित्विका श्रीचे अभिनंदन केले आहे.
“अनंतपूरच्या रीत्विका श्रीचे अभिनंदन, माउंट किलिमंजारो हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर सर करणारी आशियातली सर्वात लहान मुलगी

योगिता राठोड ठरली मिस नवी मुंबई दहाव्या पर्वाची विजेतीnew project (6)

मिस नवी मुंबईच्या आठव्या पर्वाचा अंतिम सोहळा संपन्न झाला.
या वेळी मिस नवी मुंबई २०२१ चा ताज योगिता राठोड या सोंदर्यवतीने पटकावला. सोबतच दुसऱ्या व तिसऱ्या जागेवर अनुक्रमे पायल रोहेरा व अपर्णा पाठक  हिने बाजी मारली.
परीक्षक म्हणून लिव्हा मिस दिवा सुपरनॅशनल २०२० ची विजेती अवृत्ती चौधरी,मिस आईशिया इंडिया २०१८ ची विजेती सिमरण म्हलहोत्रा , मिसेस इंडिया ब्युटी क्विन ची विजेती व अभिनेत्री डॉ. इलाक्षी मोरे,संजीव कुमार,अशोक मेहरा यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावली.

भारतातील शाळकरी विद्यार्थ्यांकडून १८ लघुग्रहांचा शोधUntitled 22

भारतीय विद्यार्थ्यांच्या चमूने एका वैज्ञानिक प्रकल्पात अठरा नवीन लघुग्रहांचा शोध लावला असल्याचे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने (आयएयू) म्हटले आहे.
भारतातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध प्रकल्पात भाग घेतला होता.
स्टेम व स्पेस या संस्थांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संशोधन आघाडीच्या मदतीने नासा नागरी विज्ञान प्रकल्पाचा भाग म्हणून ही मोहीम हाती घेतली होती.
गेल्या दोन वर्षांत भारतातील दीडशे विद्यार्थी यात सहभागी झाले. त्यात एकूण १८ नवे लघुग्रह शोधण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर व खगोलीय माहिती विश्लेषण यातून रोज दोन-तीन तास काम करून लघुग्रह शोधले आहेत.
सुरुवातीला प्राथमिक निरीक्षणात ३७२ लघुग्रह ओळखण्यात आले. त्यानंतर १८ हंगामी लघुग्रह म्हणून मान्य करण्यात आले.

फेब्रुवारीमध्ये जमा झालेला जीएसटी महसूल १.१३ ट्रिलियन रुपयेThe GST's initial premise should be revisited - The Hindu BusinessLine

फेब्रुवारी महिन्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) वसुलीने एक ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडला
फेब्रुवारीमध्ये जमा झालेला जीएसटी महसूल १.१३ ट्रिलियन रुपये होता, जो मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढला आहे.
“गेल्या पाच महिन्यांतील जीएसटीच्या उत्पन्नातील वसुलीच्या अनुषंगाने फेब्रुवारी २०२१ या महिन्यातील महसूल मागील वर्षातील याच महिन्यात जीएसटीच्या उत्पन्नाच्या तुलनेत ७ टक्क्यांनी अधिक आहे,” असे सरकारने सांगितले.
एकूण जमा झाल्यापैकी केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) सुमारे २१,०९२ कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) २७,२७३ कोटी रुपये आहे. दरम्यान, एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) संकलन ५५,२५३ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेले २४,३८२ कोटी रुपये) आणि सेस ९,५२५ कोटी (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या ६६० कोटी रुपयांचा समावेश आहे) आहे.
सरकारने सीजीएसटीला २२, ३९८ कोटी रुपये आणि आयजीएसटीकडून १७.५३४ कोटी रुपये नियमित सेटलमेंट म्हणून घेतले आहेत. या व्यतिरिक्त, केंद्र व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५०:५० च्या गुणोत्तरानुसार आयजीएसटीमध्ये तात्पुरता म्हणून केंद्रानेही ,४८,००० कोटी रुपयांचा तोडगा काढला आहे.
या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल १५ टक्क्यांनी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) होणारा महसूल मागील वर्षात याच महिन्यात या स्त्रोतांकडून प्राप्त झालेल्या उत्पन्नात ५ टक्के जास्त होता.

Share This Article