⁠  ⁠

Current Affairs 14 February 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार

  • मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. याचप्रमाणे क्रिकेटपटू स्मृती मानधना, स्क्वॉशपटू महेश माणगावकर, टेनिसपटू ऋतुजा भोसले यांच्यासह ५५ खेळाडूंना राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी २०१७-१८चा शिवछत्रपती पुरस्कार घोषित केला आहे.
  • उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार १५ जणांना घोषित करण्यात आला. तसेच राज्य क्रीडा साहसी पुरस्कार साताऱ्याच्या प्रियंका मोहितेला (गिर्यारोहण) देण्यात येणार आहे. येत्या रविवारी, १७ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या समारंभात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञाने दिला जागतिक मंदीचा इशारा

  • नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांनी आर्थिक मंदीचा इशारा दिला आहे. त्यांनी आर्थिक निती बनवणाऱ्यांमध्ये तयारीची कमतरता असल्याचा हवाला देताना म्हटले की, २०१९ च्या अंतास किंवा पुढच्या वर्षी जागतिक मंदी येण्यासची मोठी शक्यता आहे.
  • आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषचे (आयएमएफ) प्रबंध निर्देशक क्रिस्टिन लगार्ड यांनीही जगभरातील सरकारांना सावध करताना आर्थिक वृद्धी अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यानंतर उठणाऱ्या वादळाचा सामना करण्यास तयार राहण्यास सांगितले होते. क्रुगमन हे दुबई येथील जागतिक शिखर संमेलनात बोलत होते.

ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांचे निधन

  • गोवा विधानसभेचे माजी उपसभापती आणि बंडखोर कवी विष्णू सूर्या वाघ (५३) यांचे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात निधन झाले.त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गोव्यात आणण्यात येणार आहे.
  • विष्णू वाघ हे २०१२ साली गोवा विधानसभेचे सदस्य बनले. साहित्य क्षेत्रासह संगीत, नाटय़, चित्र, शिल्प आदी कलांवर वाघ यांचे प्रभुत्व होते. मराठी राजभाषा व्हावी, यासाठी केलेल्या अनेक आंदोलनांत ते सतत अग्रभागी होते.
  • त्यांचे अनेक कवितासंग्रह, नाटके, एकांकिका गोव्यासह देशभर गाजल्या. साहित्यिक म्हणून सिद्धहस्त असतानाच राजकीय क्षेत्रातही त्यांनी विशेष ठसा उमटवला होता.
  • कला अकादमीचे ते उपाध्यक्ष होते. ‘काव्यहोत्र’ या कार्यक्रमाद्वारे त्यांनी देशभरातील कवींना गोव्यात एकत्र करून कवितेला राजाश्रय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.

राजस्थानात गुज्जरांना पाच टक्के आरक्षण

  • राजस्थानातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या गुज्जर समाजाचे आंदोलन शमवण्यासाठी अखेर राज्य सरकारने तातडीची पावले उचलून या समाजाचा समावेश मागासवर्गीयांमध्ये केला आहे. गुज्जर व चार इतर समाजांना शिक्षण व नोकऱ्यांत एकत्रित पाच टक्के आरक्षण देणारे विधेयक राज्य सरकारने बुधवारी विधानसभेत संमत केले.
  • राज्य सरकारने विधानसभेत गुज्जर, बंजारा, गाडिया लोहार, राईका व गडरिया समाजाला एकत्रित ५ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याद्वारे राज्यातील मागासवर्गीय आरक्षण २१वरून २६ टक्के झाले आहे. ‘हे पाच समाज सर्वाधिक मागास असून, त्यांना स्वतंत्र आरक्षणाची आवश्यकता आहे’, असे या विधेयकात नमूद करण्यात आले आहे.

Share This Article