⁠  ⁠

चालू घडामोडी : १७ नोव्हेंबर २०१९

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 17 November 2019

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ८ हजारांची मदत जाहीर

– महाराष्ट्रामध्ये एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये शेत मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.

– २ हेक्टरपर्यंक शेती असलेल्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे. खरीपासाठी प्रति हेक्टरी ८ हजार तर फळबागांसाठी १८ हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

– अजून रब्बीमध्ये (शेतात) पाणी भरलेले असल्याने अजून महिनाभर हरभऱ्याची पेरणी करता येणार नाही. त्यामुळे या वर्षी हरभऱ्याच्या पिकापासून येथील शेतकऱ्यांवर वंचित राहण्याची वेळ आली आहे. ८५०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केलेले बियाणेही पुढील वर्षीच्या हंगामापर्यंत ते चांगले राहणार नसल्याने येथील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

‘सजग’ गस्तीनौकेचे जलावतरण

sajag

– भारतीय बनावटीच्या गस्तीनौकेचे गुरुवारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांच्या हस्ते गोवा शिपयार्ड येथे जलावतरण झाले. त्यांनी या गस्तीनौकेचे ‘सजग’ असे नामकरण केले. यावेळी श्रीपाद नाईक, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव सुभाष चंद्रा, तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन उपस्थित होते.

– भारतीय तटरक्षक दलासाठी पाच गस्तीनौका बांधणीचा प्रकल्प गोवा शिपयार्डने हाती घेतला आहे. त्यापैकी ‘सजग’ ही तिसरी गस्तीनौका आहे. पाच गस्तीनौकांच्या प्रकल्पाचे १३ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या नौकांचा वापर प्रादेशिक सागरी सीमांमधील अनन्य आर्थिक क्षेत्राच्या रक्षणासाठी केला जाणार आहे.

– अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि संगणकीय नियंत्रण कक्षाने युक्त अशी ही ‘सजग’ नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यातील सर्वात आधुनिक नौका आहे. २४०० टन वजनाच्या या नौकेत बचावकार्यासाठी आणि चाचेगिरीविरोधी शीघ्रकृती नाव, तोफा, इत्यादी शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत.

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार

– दिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळावधीत होणार्‍या ‘विश्व कबड्डी चषक 2019’ या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आले आहे. ही स्पर्धा पंजाब राज्यात खेळवली जाणार आहे.

– यावर्षी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, केनिया, न्यूझीलँड, पाकिस्तान आणि कॅनडा अश्या नऊ संघांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.

युरो चषक पात्रता फुटबॉल स्पर्धा : फिनलँड प्रथमच पात्र

– फिनलँडने लिएचेनस्टेनचा ३-० असा पाडाव करत युरो चषकासाठी पहिल्यांदाच पात्र ठरण्याची किमया साधली आहे. स्वीडननेही रोमानियावर २-० असा विजय मिळवत पुढील वर्षीच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

– फिनलँडने आपल्या फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्याचा मान पटकावला आहे. नॉर्विच सिटीचा आघाडीवीर टीमू पुक्की याच्या दोन गोलमुळे, तर जस्से टुओमिनेन याने सुरुवातीलाच केलेल्या गोलमुळे फिनलँडने मोठा विजय मिळवला. फिनलँडने ज-गटात १८ गुणांसह इटलीपाठोपाठ (२७ गुण) दुसरे स्थान मिळवत मुख्य फेरीत आगेकूच केली आहे.

Mission MPSC चे मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर फॉलो करायला विसरू नका.

Share This Article