Table of Contents
Current Affairs : 27 November 2020
भारतीय आयटी क्षेत्राचे ‘पितामह’ फकिर चंद कोहली यांचं निधन

भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून परिचयाचे असलेले फकिर चंद कोहली यांचं वयाच्या ९६ व्या वृद्धापकाळानं निधन झालं.
कोहली हे देशातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
फकिर चंद कोहली यांचा जन्म १९ मार्च १९२४ रोजी पेशावरमध्ये झाला.
१९७० मध्ये फकीरचंद कोहली यांच्या खांद्यावर टाटा इलेक्ट्रीक कंपन्यांच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
१९७० मध्ये कंपनीच्या संचालकपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या खांद्यावर टीसीएसच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोपवण्यात आली.
१९९१ मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये कोहली सक्रियपणे सहभागी होते. हा भारतातील हार्डवेअर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग होता.
टीसीएसचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी देशाला १०० अब्ज डॉलर्सचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग तयार करण्यास मदत केली.
भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फकिर चंद कोहली यांना २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
अखेर तिरंदाजी संघटनेला मिळाली मान्यता

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तब्बल आठ वर्षांनंतर अखेर भारतीय तिरंदाजी संघटनेला (एएआय) मान्यता दिली आहे.
तसेच तिरंदाजी संघटनेचा समावेश राष्ट्रीय क्रीडा महासंघामध्येही (एनएसएफ) करण्यात आला आहे.
राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेनुसार उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव यांच्या नियुक्त्या झाल्या नसल्याने क्रीडा मंत्रालयाने त्यांना मान्यता दिलेली नाही. त्यासाठी नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश एएआयला देण्यात आले आहेत.
जीडीपी १७.९% पर्यंत सुधारण्याची शक्यता

दुसऱ्या तिमाहीचे (जुलै-सप्टेंबर) जीडीपीचे अधिकृत आकडे शुक्रवारी जारी होतील. जीडीपीत जून तिमाहीच्या स्तरापेक्षा १३.२% ते १७.९% पर्यंत सुधारण्याची अपेक्षा आहे. त्यांनी सप्टेंबर तिमाहीत जीडीपी विकास दर उणे ६% ते उणे १०.७% पर्यंत नोंद होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
एप्रिल ते जूनच्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दरात विक्रमी २३.९% ची घसरण नोंदली होती. जीडीपी विकास दर सुधारणा शक्यतेमागे ३ कारणे होऊ शकतात.प्रथम, अनलॉकच्या विविध टप्प्यांनंतर आर्थिक हालचाली सामान्य पातळीवर परतत आहेत. दुसरे, सणासुदीत पुढे वाढीचा परिणाम. तिसरे, लिस्टेड कंपन्यांचा सप्टें. तिमाहीत नफा.