⁠  ⁠

Budget 2020 Highlights: अर्थसंकल्प 2020

Rajat Bhole
By Rajat Bhole 4 Min Read
4 Min Read
Budget 2020

Budget 2020 Highlights

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये आपला दुसरा अर्थसंकल्प 2020 (Budget 2020) सादर केला.
अर्थसंकल्पाचे वाचन करत असताना सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणा केल्या.

जीएसटी

1. जीएसटी कर लागू करणं हे देशाच्या प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल होतं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसंच महागाई नियंत्रणात ठेवण्यात आम्हाला यश आलं असंही त्या म्हणाल्या आहेत.
2. एप्रिल 2020 पर्यंत जीएसटीचं नवं व्हर्जन येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

कृषी आणि सिंचनBudget 2020

1. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.  विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करावी लागेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी आम्ही 16 कलमी कार्यक्रम आणतो आहोत. ज्याद्वारे शेतकऱ्यांची प्रगती करणाऱ्यावर भर दिला जाईल. सौर उर्जेवर शेती पंप सुरु केले आहेत. आणखी 15 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.

2. अन्नदाता उर्जादाता बनवण्यावर भर. जलसंकटात असलेल्या 100 जिल्ह्यांना अर्थसहाय्य देणार. शेत जमिनींचा वापर चांगल्या पद्धतीने करुन अधिक उत्पन्न कसं घेता येईल यावर भर असणार आहे.

3. किसान रेल योजना सुरू करून दूध, मांस, मासे वाहतूक करणे सुसह्य करणार अशी घोषणा.
4. कृषी आणि सिंचनासाठी 2.83 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ग्रामीण

1. स्वच्छ भारत योजनेसाठी – 12 हजार 300 कोटींची तरतूद.

2. ग्रामीण भागात इंटरनेटचं जाळं पसवरणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. भारत नेट योजनेद्वारे गावांमध्ये इंटरनेट पसरवलं जाणार. यासाठी 6 हजार कोटींची तरतूद.

3. मासेमारीला उत्तेजन देण्यासाठी सागर मित्र योजना.. देशातले उत्पादन 200 लाख टन करण्याचे लक्ष्य.

महिला

1. महिला सबलीकरण आणि विकासासाठी २८ हजार कोटी
2. पोषक आहारासाठी ३५ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद
3. अंगणवाडी वर्कर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहार
4. आंगणवाडी योजनेंतर्गत 10 लाख नागरिकांना लाभ

शिक्षणBudget 2020

1. शिक्षण क्षेत्रासाठी – 99 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
2. शिक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे.
3. स्कील डेव्हलपमेंटवर 3 हजार कोटी खर्च करणार.

पायाभूत सुविधा

1. दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करणार. चेन्नई-बंगळूर
2. 2 हजार किमीचे सागरी रस्ते बांधले जाणार.

3. उडान योजने अंतर्गत नव्या 100 विमानतळांची निर्मिती केली जाणार आहे.
4. १५० नव्या हायस्पीड ट्रेन.
5. खाजगी क्षेत्राला डेटा सेंटर पार्क निर्मिती करण्यासाठी आवाहन.

आरोग्य Budget 2020

1. आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटी,
2. ‘फिट इंडिया‘ला प्रोत्साहन देणार,
3. ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवणार,
4. 2025 पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचं लक्ष्य

मागासवर्गीय समाज

1. मागासवर्गीयांसाठी 85 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
2. अनुसूचित जाती जमातींसाठी 53 हजार 700 कोटींची तरतूद कऱण्यात आली आहे.

पर्यटन Budget 2020

1. संस्कृती मंत्रालयासाठी 3 हजार 150 कोटी रुपयांची तरतूद
2. 5 पुरातत्व ठिकाणांचा विकास करणार
3. 4 संग्रहालयांचे नुतनीकरण करणार
4. रांचीमध्ये आदिवासी संग्रहालय स्थापन करणार
5. अहमदाबादेत समुद्री संग्रहालय उभारणार
6. संस्कृती रक्षणासाठी अभिमत विद्यापीठ सुरु करणार

बॅंक्स

1. करदात्यांचा कसलाही छळ होणार नाही
2. बँकांमधील नोकरभरतीत बदल होणार
3. देशात कायद्यानुसार टॅक्स पेयर चार्टर आणणार
4. टॅक्स भरणाऱ्यांच्या अडचणी दूर करणार

इतर

1. G20 परिषद यंदा भारतात होणार, G20 परिषदेसाठी 100 कोटींची तरतूद.
2. एलआयसीचा मोठा हिस्सा सरकार विकणार. LIC चा आयपीओ आणला जाणार.
3. जम्मू काश्मीरसाठी ३० हजार ७५७ कोटींची तरतूद.
4. लडाखसाठी ५ हजार ९५८ कोटींची तरतूद

कररचना – टॅक्सBudget 2020

स्लॅबमध्ये बदल
1. पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त
2. 5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर
3. 7.5 ते 10 लाखांसाठी 15 टक्के
4. 10 ते 12.50 पुढे 20 टक्के
5. 12.50 ते 15 लाख 25 टक्के
6. 15 लाखांवर 30 टक्के

Share This Article