⁠  ⁠

Current Affair 19 January 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

मुस्लिम व्यक्तीने साकारली जगातील सर्वांत उंच दुर्गा मूर्ती;
लिम्का बुकमध्ये नोंद

  • एका मुस्लिम मूर्तिकाराने जगातील सर्वाधिक उंच दुर्गा मातेची मूर्ती साकारण्याचा विक्रम केला आहे. नुरुद्दीन अहमद असे त्यांचे नाव असून त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
  • विशेष म्हणजे एका हिंदू देवतेची मूर्ती साकारणाऱ्या या मुस्लिम कलाकाराने ‘कलाकाराला कोणताही धर्म नसतो’ असे सांगत उच्च कोटीचा सामाजिक संदेशही दिला आहे.
  • अहमद हे गुवाहाटीचे काहिलीपाडा भागातील रहिवासी आहेत. त्यांनी गुवाहाटीतील विष्णुपूरमध्ये सप्टेंबर २०१७ मध्ये बांबूपासून ९८ फूट उंच दुर्गामातेची मूर्ती साकारली होती.
  • सप्टेंबर २०१७ मध्ये हिंदू आणि मुसलमान या दोन्हीही समुदायांच्या ४० लोकांनी मिळून अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली ती विशाल मूर्ती बनवली होती. ती मूर्ती पाहण्यासाठी विष्णुपूरामध्ये एक लाख लोक आले होते. अहमद यांनी केवळ ७ दिवसांमध्ये ही मूर्ती बनवली होती.

मुलांना देण्यात येणार्‍या राष्ट्रीय पुरस्काराचे नाव बदलून
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

  • पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल दिनी निवडलेल्या मुलांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. पण या पुरस्काराचे नाव बदलून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार करण्यात आले आहे.
  • 61 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आईसीसीडब्ल्यूने निवडलेल्या धाडसी विद्यार्थी परेडमध्ये सहभागी होतात. पण याऐवजी महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालयाने निवडलेल्या मुलांचे पुरस्कार घोषित होतील.
  • बाल वीरता पुरस्कारासाठी देशभरातून निवडलेल्या 21 धाडसी मुले प्रजासत्ताक दिनी राजपथावर उपस्थित नसतील. 1957 नंतर असे घडण्याची ही पहिलीच वेळ आहे
  • सर्व धाडसी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्ती पत्रक आणि मेडल दिले जाते. पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च देखील परिषद करते. भारत पुरस्कारासाठी 50 हजार, संजय चोप्रा पुरस्कारासाठी 40-40 हजार रुपये, बापू गायधनी पुरस्कारासाठी 25 हजार रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी 20-20 हजार रुपये दिले जातात.

बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राचा सुवर्ण‘पंच’!

  • पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने बॉक्सिंगमध्ये हरयाणा व मणिपूर यांच्या आव्हानास यशस्वीरीत्या सामोरे जात १७ वर्षांखालील वयोगटात पाच सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामध्ये देविका घोरपडे, मितिका गुणेले, बिस्वामित्र चोंगथोम, शेखोमसिंग व येईफाबा मितेई हे सुवर्णपदकांचे मानकरी ठरले.
  • देविकाने ४६ किलो गटात हरयाणाच्या तमन्नावर मात करीत दिवसाची सुरुवात सोनेरी केली. मितालीने ६६ किलो गटात हरयाणाच्या मुस्कानला ४-१ अशा फरकाने पराभूत केले. मुलांच्या ४८ किलो गटात महाराष्ट्राच्या चोंगथोमने मिझोरामच्या जोरामुओनावर ४-१ अशी सहज मात करीत सुवर्णपदक जिंकले. शेखोम सिंगने ५० किलो गटात सुवर्णपदक जिंकताना मिझोरामच्या लाल्दिसांगाचा पराभव केला. पुण्याच्या आकाश गोरखाला आणि लैश्राम सिंगलाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारतासाठी ‘ती’ मिसाइल टेक्नॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर

  • भारताला अमेरिकेकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळू शकते. शेजारी देश चीन-पाकिस्तानकडून असणारे आव्हान लक्षात घेता अमेरिकेकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळाले तर ते गेमचेंजर ठरेल. ट्रम्प प्रशासनाने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सहकार्यासंबंधी भारताबरोबर चर्चा सुरु केली आहे.
  • भारत पाच अब्ज डॉलर मोजून रशियाकडून एस-४०० हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकत घेणार आहे. भारताच्या या निर्णयावर अमेरिकेने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. क्षेपणास्त्र क्षमता आता फक्त जगातील काही भागांपुरता मर्यादीत राहिलेली नाही.
  • दक्षिण आशियातील अनेक देश आता अत्याधुनिक आणि वेगवेगळया टप्प्यापर्यंत मारक क्षमता असलेली बॅलेस्टिक, क्रूझ क्षेपणास्त्रे विकसित करत आहेत असे पेंटागॉनच्या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेकडून आपल्याला अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळाले तर चीन-पाकिस्तानवर दबाव वाढेल.

चीनने केली जीडीपीमध्ये घट

  • चीनने आर्थिक वर्ष २०१७-१८मधील विकासाचा दर ६.९ टक्क्यांवरून घटवून ६.८ टक्क्यांवर आणला आहे. तेथील सरकारच्या सांख्यिकी विभागाने शुक्रवारी ही बाब जाहीर केली. त्यामुळे २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासदर घटण्याचा आणि मंदी परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
  • चीनच्या ‘राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरो’ने (एनबीएस) आपल्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठी अर्थव्यवस्थेचा आकार ८२,७०० अब्ज युआनवरून ८२,१०० अब्ज युआन करण्यात आला आहे. चीनच्या सांख्यिकी ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार वार्षिक जीडीपीचा आढावा दोनदा घेतला जातो. या दोन्ही आढाव्यांमध्ये जीडीपीत मोठी तफावत असल्याचे दिसून आले होते.
Share This Article