⁠  ⁠

MPSC : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात मोठी बातमी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आयोगानं महत्त्वाची माहिती दिली आहे. गट ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालानंतर जानेवारी 2022 मध्ये मुख्य परीक्षा आयोजित केली जाणार आहे, असल्याचं आयोगाकडून ट्विटद्वारे सांगण्यात आलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. 4 सप्टेंबरला झालेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची उत्तर तालिका तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे.

एमपीएससीकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची उत्तरतालिका प्राथम्याने अंतिम करण्यात येत आहे. एमपीएससीकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा जानेवारी 2022 च्या दुसऱ्या आठवड्यानंतर घेण्यात येतील, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

कोरोनामुळे पूर्व परीक्षा संप्टेंबरमध्ये
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता 4 सप्टेंबरला परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

Share This Article