• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Wednesday, August 17, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

MPSC Daily Current Affairs 5 January 2018

Saurabh Puranik by Saurabh Puranik
January 5, 2018
in Daily Current Affairs
0
india-surgical-strike-against-pakistan
WhatsappFacebookTelegram

Table of Contents

  • 1) अमेरिकेने पाकिस्‍तानचे 7 हजार कोटींचे लष्‍करी साहाय्य रोखले
  • 2) राज्याच्या रेती धोरणात बदल
  • 3) अय्यप्पा मंदिरासाठी वयाचा दाखला महिलांना आवश्यक
  • 4) बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटरनॅशनल बोर्ड
  • 5) पाकिस्तानचे १० सैनिक ठार

1) अमेरिकेने पाकिस्‍तानचे 7 हजार कोटींचे लष्‍करी साहाय्य रोखले

अमेरिकेने पाकिस्‍तानचे तब्‍बल 7,298 कोटींचे लष्‍करी साहाय्य रोखण्‍याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने याच आठवड्यात पाकला दिली जाणारी 1628 कोटी रुपयांची मदत रोखली होती. जोपर्यंत पाकिस्‍तान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत नाही, तोपर्यंत पाकिस्‍तानला मदत न करण्‍याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेकिकेच्‍या गृह विभागाचे प्रवक्‍ते हीदर न्‍यूर्ट यांनी स्‍पष्‍ट केले आहे की, पाकला अमेरिकतर्फे दिले जाणारे सर्व लष्‍करी साहाय्य रोखण्‍यात आले आहे. पाक सरकारला हक्‍कानी नेटवर्क, तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांविरोधात अशी कारवाई करावी लागेल, ज्‍याचे परिणामही दिसतील. पाकच्‍या इशा-यावर दहशतवादी अमेरिकेला लक्ष्‍य करत आहे, असा गंभीर आरोप हीदर यांनी केला आहे. आता आपण दक्षिण आशियासंबंधी नवे धोरण स्‍वीकारले आहे, असे त्‍यांनी सांगितले.

2) राज्याच्या रेती धोरणात बदल

रेतीघाटातून अवैध उत्खनन होऊ नये, यासाठी लिलावधारकालाच रेतीघाट व तपासणी नाका अथवा वाहतुकीच्या वाहनातच सीसीटिव्ही बसवून छायाचित्रणाची सीडी दर दोन आठवड्यांत तहसीलदारांना सादर करण्याची तरतूद राज्य शासनाने नव्या रेती धोरणात केली आहे़. राज्य शासनाने जुन्या रेती धोरणात अनेक बदल केलेत़ त्यानुसार प्रत्येक रेती घाटावर वाहतुकीसाठी एकच रस्ता ठेवला जाणार आहे़ घाटावर छायाचित्रण करण्यासाठी लिलावधारकांनाच सीसीटिव्ही कॅमेरा बसवावा लागणार आहे़ विशेष म्हणजे, किमान एक सीसीटिव्ही कॅमेरा वाहतुकीच्या साधनातच बसविणे बंधनकारक आहे़ शिवाय, घाटातील रेतीची वाहतूक करणारी सर्व वाहने गावातील ज्या ठिकाणावरून ये-जा करतात़, त्या मार्गावरही छायाचित्रणासाठी कॅमेरा लावण्याचे बंधन घालण्यात आले़. लिलाव न झालेल्या घाटावर रेतीची अवैध वाहतूक होण्याची शक्यता आहे़ त्या मार्गातही कॅमेरा बसविणे आवश्यक आहे. केवळ याच मार्गावरील सीसीटिव्हींचा खर्च जिल्हा नियोजन समिती उचलणार आहे, असेही या धोरणात नमूद केले़ लिलावधारकांनी सादर केलेली सीडी तहसीलदारांना प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी केव्हाही रेतीघाटाची तपासणी करू शकतात़.

3) अय्यप्पा मंदिरासाठी वयाचा दाखला महिलांना आवश्यक

केरळमधील शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करू इच्छिणा-या महिलांना लवकरच वयाचा दाखला सोबत न्यावा लागणार आहे. भगवान अय्यप्पा ‘नैस्तिक ब्रह्मचारी’ असल्याने या मंदिरात मासिक पाळी येण्याच्या वयाच्या वयोगटातील (१० ते ५० वर्षे) महिलांना अजिबात प्रवेश न देण्याची पूर्वापार प्रथा आहे. तरीही या वयोगटातील महिला मंदिरात प्रवेश करण्याचा आग्रह धरतात. यामुळे या भाविक महिला व मंदिराचे कर्मचारी व पोलीस यांच्यात वादावादी होते. असे अप्रिय प्रकार टाळण्यासाठी महिलांनी आपण प्रतिबंधित वयोगटातील नाही हे खात्रीपूर्वक दाखविण्यासाठी वयाचा मान्यताप्राप्त दाखला सोबत आणावा, असा नियम लवकरच करण्यात येणार आहे. मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष ए. पद्मकुमार यांनी सांगितले की, मंदिराच्या प्रथा आणि परंपरांशी तडजोड केली जाऊ शकत नाही.

4) बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटरनॅशनल बोर्ड

राज्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, सुलभ शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कंपनी शाळा ही संकल्पना सुरू होत आहे. शासनाच्या अनुदानित- विनाअनुदानित आदी सर्वच शाळांप्रमाणे या कंपनी शाळांना नियम असतील. त्यातून नुकसान होण्याऐवजी चांगलाच फायदा होईल असे सांगतानाच राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकन्डरी एज्युकेशन या संस्थांच्या धर्तीवर राज्यातील बिगर इंग्रजी शाळांसाठी राज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा गुरुवारी केली.

5) पाकिस्तानचे १० सैनिक ठार

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी गुरुवारी पहाटे जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर धडक कारवाई करत पाकिस्तानच्या दोन चौक्या उद‍्ध्वस्त केल्या. या कारवाईत पाकिस्तानचे आठ ते दहा सैनिक ठार झाले आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून बुधवारी केलेल्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आर. के. हजरा हे वाढदिवशीच शहीद झाले होते. या घटनेनंतर २४ तासांतच बीएसएफने ही कारवाई केली.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Tags: 5 JanuaryCurrent Affairs in Marathi
SendShare245Share
Saurabh Puranik

Saurabh Puranik

Related Posts

Current Affairs 17 August 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 17 ऑगस्ट 2022

August 17, 2022
Current Affairs 16 August 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 16 ऑगस्ट 2022

August 16, 2022
Current Affairs 14 August 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 14 ऑगस्ट 2022

August 14, 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Current Affairs 17 August 2022

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 17 ऑगस्ट 2022

August 17, 2022
MPSC State Service Prelims Admit Card 2021

MPSC मार्फत 433 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

August 17, 2022
Indian Force Security Services Recruitment 2022

भारतीय सेना सुरक्षा सेवा, नागपूर येथे 12वी पाससाठी सुवर्णसंधी..

August 16, 2022
ntpc

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती

August 16, 2022
cb khadki

CB Khadki : खडकी कन्टोमेंट बोर्डात विनापरीक्षा थेट भरती, इतका मिळेल पगार?

August 16, 2022
gail bharti

GAIL मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पात्रतेसह पगार?

August 16, 2022
ADVERTISEMENT
  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group