⁠  ⁠

MPSC तर्फे पूर्व परीक्षेच्या वेळी पालन करावयाच्या सूचना जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

कोरोनाच्या वाढत्या महामारीमुळे राज्य सेवा आयोगाची पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी होणारी परीक्षा रविवारी २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे. परीक्षेची तारीख बदली असली तरी परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्र तेच राहणार आहे.

परीक्षा केंद्रावर जाताना कोणती काळजी घ्यावी?
या संदर्भात आयोगाने परीक्षेच्या वेळी पालन करावयाच्या सूचना जाहीर केल्या आहेत.

१) सूचनांचे कटाक्षाने पालन करावे-
सोशल डिस्टन्सिंगसाठी परीक्षा उपकेंद्रावरील योग्य माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तीपत्रिका आदी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.

२) स्वतंत्र बैठक व्यवस्था व कीट आवश्यक-

कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे (ताप, सर्दी, खोकला इ.) दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी / कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांना मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप आदी गोष्टी असलेलं पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था करण्यात येईल.

३) हात सतत सॅनिटाईज करणे आवश्यक-
परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईज करणे आवश्यक आहे.तसेच
परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले किट प्रत्येक उमेदवाराला देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्रांकरिता करायचा आहे.

४) मास्क वापरणे अनिवार्य-
परीक्षा केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांनी किमान तीन पदरी कापडी मास्क वापरणे अनिवार्य.

५) शारीरिक अंतर राखणे अनिवार्य- परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे.

६) सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे-
कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

Share This Article