⁠  ⁠

MPSC : PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ तारखेला मुख्य परीक्षा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एसपीएससी परीक्षेच्या पूर्व परीक्षांच्या निकालाची सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती. मात्र आता ती प्रतीक्षा संपली आहे.  एमपीएससी दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब 2020 PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात संयुक्त पूर्व परीक्षा आली होती. त्या परीक्षेच्या निकालाची एमपीएससी आयोगानं संकेतस्थळावर यादी जाहीर केली आहे. त्यामुळे पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी मुख्य परीक्षा देऊ शकणार आहेत, या विद्यार्थ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

तसेच विद्यार्थ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे, ती म्हणजे एमपीएससी मुख्य परीक्षेची तारीखही जाहीर झाली आहे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 1 जानेवारी 2020 ला मुख्य परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नववर्षाच्या तोंडावर मोठी गूडन्यूज मिळाली आहे. पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानं विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तसेच मुख्य परीक्षेच्याही तारखा आल्यानं विद्यार्थ्यांना त्या वेळेचे नियोजन करून अभ्यास करता येणार आहे. कोरोनाकाळात अनेकदा परीक्षा रद्द झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. राज्य सरकारने यावर तोडगा काढत पूर्व परीक्षेच्या तारखा पुन्हा जाहीर करून परीक्षा घेतल्या होत्या.

Share This Article