⁠  ⁠

राणी ‘पद्मावती’ आणि जौहर

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 2 Min Read
2 Min Read

‘पद्मावती’ चित्रपटावरून सध्या मोठा वादंग सुरू आहे. इतिहासात फेरफार करून चित्रपट सादर केला जात असल्याचे म्हटले जात आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू आहे. चित्रपटाचे डायरेक्टर संजय लीला भन्साली आहेत.
चित्तोडगडचे 42वे शासक रावल रतन सिंह यांच्या 15 राण्यांपैकी एक होत्या राणी मदन कंवर पद्मिनी. त्यांनाच इतिहासकार पद्मावती या नावाने ओळखतात. राणी पद्मिनीच्या जौहर आणि अल्लाउद्दीन खिलजीशी निगडित कहाण्या राजस्थानच्या शाळा, कॉलेजमध्ये शिकवल्या जात आहेत. यात कुठेही प्रेमप्रसंगांचा उल्लेख नाही. सव्वा दोन शतकांनंतर लिहिलेल्या कथेत इतिहासकार सांगतात की, सुफी कवी मलिक मोहम्मद जायसीने इ.स. 1540 मध्ये अवधी भाषेत चित्तोडवर 1303 मध्ये झालेल्या आक्रमणावर पद्मावती काव्य लिहिले. आख्यायिकांच्या आधारे घटनेच्या सव्वा दोन शतकांनंतर काव्य लिहिण्यात आले. मलिक मोहम्मद जायसीने पद्मावत नावाच्या काव्यात इ.स. 1303 मध्ये चित्तोडगडवर झालेल्या आक्रमण आणि ऐतिहासिक विजयाचे वर्णन केले आहे. यात त्याने राणी पद्मिनीचे नाव पद्मावती ठेवले. यात कथाकार लिहितो की, राणी पद्मावती खूप सुंदर होती. अल्लाउद्दीन खिलजीने पद्मावतीच्या सौंदर्याबाबत ऐकले तेव्हा तिला पाहण्यासाठी आसुसला होता. खिलजीच्या सैन्याने चित्तोडला घेरले होते. आणि रावल रतन सिंहच्या जवळ पद्मावतीला भेटण्याचा संदेश पाठवला. यात पद्मावतीला भेटू दिल्यास चित्तोड सोडून चालल्या जाऊ. आक्रमणही करणार नाही, असे या संदेशात होते. रावल रतन सिंहने याबाबत पद्मावतीशी चर्चा केली. राणी यासाठी तयार नव्हती, परंतु युद्ध टाळण्यासाठी एक उपाय काढला. खिलजी तिच्या प्रतिबिंबाला कमलपुष्पांच्या तलावात पाहू शकतो. खिलजीने तलावात पद्मिनीचे प्रतिबिंब पाहिले. राणीच्या सौंदर्यावर मोहित होऊन खिलजीने आक्रमण केले. या युद्धात रावल रतन सिंह आणि त्यांचे सैनिक मारले गेले. तथापि, अल्लाउद्दीन किल्ल्यापर्यंत पोहोचण्याआधी राणी पद्मिनीने हजारो स्त्रियांसह जौहर  केले.

TAGGED:
Share This Article