⁠  ⁠

चालू घडामोडी : २२ मे २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अध्यक्षीय निवडणुकीत अन्वी भुतानी विजयीUntitled 8 3

मानव विद्या शाखेची मूळ भारतीय वंशाची विद्यार्थिनी अन्वी भुतानी ही ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अध्यक्षीय पोटनिवडणुकीत विजयी झाली आहे.
भुतानी ही वांशिक जागरूकता व समानता मोहिमेची सहअध्यक्ष असून ऑक्सफर्ड इंडिया सोसायटीची अध्यक्ष आहे.
२०२१-२०२२ या वर्षासाठी ती अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात होती.
या निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान झाले असून २५०६ जणांनी मतदान केले २०१९ च्या तुलनेत ही वाढ १४६ टक्के आहे.
आताच्या निवडणुकीत एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. याआधी झालेल्या निवडणुकीत रश्मी सावंत ही भारतीय विद्यार्थिनी फेब्रुवारीत निवडून आली होती पण समाजमाध्यमावरील पोस्टमुळे तिने राजीनामा दिला होता.

अमेरिकेची भारताला ५० कोटी अमेरिकी डॉलरची मदतबाइडेन के नेतृत्व में कैसा होगा भारत-अमेरिका के बीच आर्थिक सहयोग का  परिदृश्य' | ORF

अमेरिकेने भारताला आतापर्यंत ५० कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक किमतीची करोनासंबंधीची मदत केली.
‘अमेरिकेचे संघराज्य सरकार व राज्य सरकारे, अमेरिकी कंपन्या, संस्था व नागरिक यांच्याकडून मिळालेल्या योगदानापोटी अमेरिकेने भारताला आतापर्यंत ५० कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक किमतीची कोविडविषयक मदत केली आहे
बायडेन प्रशासन आता करोना महासाथीमुळे प्रभावित झालेल्या दक्षिण आशियातील इतर देशांना मदत पुरवण्याच्या दृष्टीने काम करत आहे.
आरोग्यविषयक मदतसामुग्री, प्राणवायू, एन-९५ मुखपट्ट्या, जलद नैदानिक चाचण्यांच्या किट्स आणि औषधे सात विमानांतून आतापर्यंत रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती प्साकी यांनी दिली

युव्हेंटसला इटालियन चषकाचे जेतेपद0

युव्हेंटसनी अ‍ॅटलांटाचा २-१ असा पराभव करत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
युव्हेंटसचे हे इटालियन चषकाचे १४वे तर अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे पहिले जेतेपद ठरले.
दुजान कुलुसेवस्की याने ३१व्या मिनिटाला युव्हेंटसचे खाते खोलल्यानंतर अ‍ॅटलांटाने रस्लन मलिनोवस्की (४१व्या मिनिटाला) याच्या गोलमुळे सामन्यात बरोबरी साधली. मात्र फेडेरिको चिएसा याने ७३व्या मिनिटाला निर्णायक गोल करत युव्हेंटसला जेतेपद मिळवून दिले.
मोसमातील दुसरे जेतेपद पटकावल्यानंतर आंद्रिया पिलरे यांनी युव्हेंटसच्या प्रशिक्षकपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली.

Share This Article